Bajaj Housing गृहकर्जावरील व्याजदर केले कमी! स्वस्त घर घेण्याची संधी, फायदा कसा घ्याल?

| Updated on: Oct 02, 2021 | 7:52 AM

बजाज फायनान्सच्या मते, तुम्ही तुमच्या सध्याच्या गृहकर्जाची थकबाकी कंपनीला हस्तांतरित करू शकता आणि कमी व्याजदराचा लाभ घेऊ शकता. होम लोन शिल्लक हस्तांतरण उत्पादन टॉप-अप लोन सेवेसह येते. या अंतर्गत तुम्ही 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या मोठ्या टॉप-अप कर्जाचा लाभ घेऊ शकता

Bajaj Housing गृहकर्जावरील व्याजदर केले कमी! स्वस्त घर घेण्याची संधी, फायदा कसा घ्याल?
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात लोकांनी त्यांच्या घरांचा शोध तीव्र केलाय. अशा परिस्थितीत बजाज फायनान्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने गृह कर्जाचे व्याजदर कमी केलेत. कंपनीने पगार आणि व्यावसायिक वर्गासाठी गृहकर्जाचे व्याजदर 6.7 टक्के केलेत. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून कमी व्याजदर गृह कर्जाची उत्पादने चांगली क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि जॉब प्रोफाइल असलेले लोक घेऊ शकतात. विद्यमान गृहकर्ज ग्राहकांनाही कंपनी हा लाभ देत आहे. हा लाभ गृहकर्जाच्या शिल्लक हस्तांतरणावर दिला जाईल.

विद्यमान कर्जाची शिल्लक कशी हस्तांतरित कराल?

बजाज फायनान्सच्या मते, तुम्ही तुमच्या सध्याच्या गृहकर्जाची थकबाकी कंपनीला हस्तांतरित करू शकता आणि कमी व्याजदराचा लाभ घेऊ शकता. होम लोन शिल्लक हस्तांतरण उत्पादन टॉप-अप लोन सेवेसह येते. या अंतर्गत तुम्ही 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या मोठ्या टॉप-अप कर्जाचा लाभ घेऊ शकता. कंपनीने म्हटले आहे की, ही एक संपर्कमुक्त कर्ज सेवा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाते. तुम्ही कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. यानंतर सर्व संभाषण फोन आणि ई-मेलद्वारे केले जातील. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तुम्हाला एकदा कंपनीच्या अधिकाऱ्याला भेटावे लागेल. यामध्ये तुम्हाला कर्जाच्या कागदावर सही करावी लागेल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

तुम्ही किती रकमेपर्यंत गृहकर्ज घेऊ शकता?

जर तुमच्याकडे चांगली क्रेडिट इतिहास आणि चांगले उत्पन्न आणि नोकरीचा रेकॉर्ड असेल तर तुम्ही 5 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी अर्ज करू शकता. कंपनीचे म्हणणे आहे की, जर रेकॉर्ड चांगला असेल तर तुम्ही जास्त रकमेसाठी कर्जासाठी अर्ज करू शकता. रक्कम कंपनीसाठी समस्या नाही. बजाज हाऊसिंग फायनान्ससह अर्जदारांना परवडणाऱ्या दरामध्ये गृहकर्ज घेण्याचा पर्याय आहे, कारण व्याज दर रेपो रेट सारख्या बाह्य बेंचमार्कशी जोडलेले आहे. कंपनीने सांगितले की, आम्ही ग्राहकांना नियामक दरातील कपातीचा लाभ घेण्याची संधी देतो.

संबंधित बातम्या

मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक, ‘या’ गाड्या होणार प्रभावित

…तर आता रेल्वे त्यांच्या 94 शाळा बंद करणार, जाणून घ्या योजना काय?

Bajaj Housing lowers interest rates on home loans! Opportunity to buy a cheap house, how to take advantage?