मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक, ‘या’ गाड्या होणार प्रभावित

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवार 3 ऑक्टोबर 2021 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करणार आहे. विशेष म्हणजे ठाणे- दिवा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असतो.

मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक, 'या' गाड्या होणार प्रभावित
Mumbai Local

मुंबईः कोरोनाच्या संकटापायी ठप्प असलेली रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येतेय. दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेनं प्रवासाची मुभाही मिळतेय. लोकलच्या देखभाल दुरुस्तीसाठीही रेल्वे विभाग वेळोवेळी मेगाब्लॉक घेत असतो. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवार 3 ऑक्टोबर 2021 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करणार आहे. विशेष म्हणजे ठाणे- दिवा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असतो.

वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील

मुलुंड येथून सकाळी 10.43 ते दुपारी 03.46 पर्यंत सुटणारी डाउन मार्गावरील धिमी/अर्धजलद सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येऊन ठाणे, दिवा स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील. कल्याण येथून सकाळी 10.37 ते दुपारी 03.41 पर्यंत सुटणाऱ्या अप धिमी/अर्धजलद सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाऊन दिवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.00 ते संध्याकाळी 05.00 दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन धीम्या सेवांचे वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने आगमन होतील/सुटतील.

पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द

तसेच पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 पर्यंत (बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत; नेरुळ- खारकोपर सेवा रद्द राहतील) पनवेल येथून सकाळी 10.49 ते सायंकाळी 04.01 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.03 ते दुपारी 03.16 या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेलच्या दिशेने जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द

तसेच पनवेल येथून सकाळी 09.01 ते दुपारी 03.53 पर्यंत ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 03.20 या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. नेरूळ येथून सकाळी 10.15 ते दुपारी 02.45 या वेळेत खारकोपरला जाणारी डाउन मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.45 ते दुपारी 03.15 या वेळेत नेरूळसाठी खारकोपर सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असणार

ब्लॉक कालावधीदरम्यान बेलापूर आणि खारकोपरदरम्यान उपनगरीय ट्रेन सेवा वेळापत्रकानुसार चालतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. हे देखरेख मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना, कॉसिस ई-मोबिलिटी आणि राज्य सरकारमध्ये 2823 कोटींचा सामंजस्य करार

फडणवीसांचा पाहणी दौरा आणि पंकजा मुंडे अचानक ‘अनवेल’, राजकीय चर्चेला तोंड फुटलं

six-hour megablock on the Central Railway, ‘Ya’ trains will be affected

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI