AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांची गरज असताना FD तोडणे चांगले की FD वर कर्ज घेणे? जाणून घ्या

अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत लोकांकडे इमर्जन्सी फंड नसतो पण त्यांच्याकडे बँकेत FD असते. अनेक जण बँकेची FD फोडून पैशांची व्यवस्था करतात, तर अनेक जण बँकेच्या FD वर कर्ज घेऊन पैशांची व्यवस्था करतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा योग्य पर्याय कोणता असतो. चला तर मग जाणून घेऊया.

पैशांची गरज असताना FD तोडणे चांगले की FD वर कर्ज घेणे? जाणून घ्या
बँक एफडीImage Credit source: फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Apr 15, 2025 | 4:30 PM
Share

तुम्हाला पैशांची गरज असली की तुम्ही नेमकं काय करतात? FD तोडता का? की FD वर कर्ज घेता? आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती सांगणार आहोत.मपैशाची गरज कुणालाही केव्हाही भासू शकते. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने आपत्कालीन परिस्थितीसाठी नेहमीच निधी तयार ठेवला पाहिजे, जेणेकरून कठीण काळात पैशांची सहज व्यवस्था करता येईल.

दुसरीकडे, गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर बहुतेक लोक गुंतवणुकीसाठी बँक FD चा आधार घेतात. बँक FD मध्ये गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय मानला जातो.

अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत लोकांकडे इमर्जन्सी फंड नसतो पण त्यांच्याकडे बँकेत FD असते. अनेक जण बँकेची FD फोडून पैशांची व्यवस्था करतात, तर अनेक जण बँकेच्या FD वर कर्ज घेऊन पैशांची व्यवस्था करतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा बँक FD तोडणे अधिक फायदेशीर असते किंवा बँक FD वर कर्ज घेणे अधिक फायदेशीर असते. चला जाणून घेऊया.

बँकेची FD तोडणे कितपत योग्य आहे?

जेव्हा तुम्ही बँकेची FD अकाली मोडता तेव्हा त्यावर तुम्हाला प्री-फिक्स्ड इंटरेस्ट रेट रिटर्न मिळत नाही. म्हणजेच जितक्या लवकर तुम्ही FD फोडता तितके तुम्हाला FD वर मिळणारे व्याज कमी होईल. अशावेळी FD तोडल्यास तुमचा नफा कमी होईल. याशिवाय अनेक बँका मुदतपूर्व FD तोडल्यास 1 टक्के दंडही आकारतात.

FD वर कर्ज घेणे केव्हा चांगले?

जेव्हा तुम्ही FD वर कर्ज घेता तेव्हा तुम्हाला हे कर्ज सामान्य कर्जापेक्षा खूप स्वस्त मिळतं. FD वरील कर्जाचे व्याजदर FD च्या व्याजदरापेक्षा 1 ते 2 टक्के जास्त असतात. अशा परिस्थितीत तुमचे कर्ज स्वस्त होईल.

यापेक्षा चांगला पर्याय कोणता?

जर तुम्ही FD तोडून कर्ज घेतले नाही तर तुमची बचत म्हणजेच तुमची FD सुरक्षित राहते. तुम्ही नंतर कर्जाची परतफेड कराल. त्याचबरोबर तुमची FD तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित राहील. याशिवाय जर तुमची FD परिपक्व होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतील तर तुम्ही FD तोडण्याचा विचार करू शकता कारण या परिस्थितीत तुमचे नुकसान कमी होईल.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन