AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holiday List | मे महिन्यात इतके दिवस राहणार बँका बंद, त्यापूर्वीच करुन घ्या महत्त्वाची कामे

त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर पडल्यात तर तुमची फेरी वाया जाईल.  (Bank Holidays in May 2021)

Bank Holiday List | मे महिन्यात इतके दिवस राहणार बँका बंद, त्यापूर्वीच करुन घ्या महत्त्वाची कामे
Bank Holidays In August 2021
| Updated on: May 01, 2021 | 2:13 PM
Share

मुंबई : देशभरात कोरोनाचा (Coronavirus Pandemic) हाहाकार पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन यासारखे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांना घरात राहा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या दरम्यान काही अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे निर्बंधादरम्यान फक्त अत्यावश्यक कामांसाठी सूट देण्यात आली आहे. (Bank Holidays in May 2021 Check complete list here)

या पार्श्वभूमीवर बँकांनी डिजीटल व्यवहार करावे, असे आवाहन सर्वच बँकांनी केले आहे. त्यामुळे तुम्ही सर्व कामे डिजीटल पद्धतीने करावी, असे सांगितले आहे. मात्र पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागते. तसेच इतर काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मे महिन्यात किती दिवस बँका सुरु राहणार, किती दिवस बंद हे जाणून महत्त्वाचे आहे.

आरबीआयकडून यादी जारी 

नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यातील काही सुट्ट्या या राज्यापुरती मर्यादित आहे. तर काही सुट्ट्या या प्रादेशिक बँकांपुरत्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास, तुम्हाला सुट्ट्यांबद्दलची माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर पडल्यात तर तुमची फेरी वाया जाईल.

सध्या सुरु असलल्या मे (May 2021) महिन्याच्या सुरुवातीला बँकेची सुट्टी येत आहे. आज 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. त्यामुळे बहुतेक सरकारी संस्थांना सुट्टी आहे. तसेच याच महिन्यात ईद, अक्षय तृतीया आणि बुद्ध पूर्णिमा यासारखे सण येत आहेत. त्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे.

यादी बघून करा काम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या यादीनुसार, मे महिन्यात राष्ट्रीय सुट्टी, आठवड्याच्या सुट्ट्या अशा एकत्रित करुन एकूण 12 सुट्ट्या आहेत. नुकतंच याबाबत आरबीआयने rbi.org.in अधिकृत वेबसाईटवर याबाबतची यादी अपलोड केली आहे. त्यानुसार तुमची बँकांची काम सुट्टीची यादी पाहूनच करा, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

विविध राज्यांमध्ये आणि शहरात वेगवेगळे नियम

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 1 मे रोजी लखनऊ, नवी दिल्ली यासारख्या शहरातील बँका सुरु राहणार आहेत. तर 7 मे रोजी जम्मू आणि श्रीनगरमध्ये जमात-उल-विदामुळे बँकांना सुट्टी असेल. तर 14 मे रोजी ईदमुळे जम्मू, श्रीनगर, नागपूर, मुंबई यासारख्या काही शहरांना वगळता बँका बंद राहतील. तर 26 मे रोजी बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने सुट्टी असणार आहे. तर या दिवशी दिल्ली, पाटणा, लखनऊसह अनेक शहरांमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.

मे महिन्यातील बँकेच्या सुट्टीची यादी

1 मे – शनिवार – महाराष्ट्र दिन / कामगार दिन 2 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी 7 मे – शुक्रवार – जमात-उल-विदा (जम्मू आणि श्रीनगर) 8 मे – दुसरा शनिवार – आठवड्याची सुट्टी 9 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी 13 मे – गुरुवार – ईद (ईदच्या उत्सवामुळे श्रीनगर, जम्मू, नागपूर आणि कानपूरमधील बँका बंद राहतील.) 14 मे – शुक्रवार – परशुराम जयंती / ईद / अक्षय तृतीया (जम्मू, मुंबई, नागपूर येथे या दिवशी बँका खुल्या असतील.) 16 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी 22 मे – चौथा शनिवार – साप्ताहिक सुट्टी 23 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी 26 मे – गुरुवार – बुद्ध पूर्णिमा 30 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी

(Bank Holidays in May 2021 Check complete list here)

संबंधित बातम्या : 

आजपासून ‘या’ 5 गोष्टी बदलणार, बँक खात्यापासून स्वयपांकघरापर्यंत परिणाम होणार

कोरोना संकटाच्या काळात ‘या’ बँकेकडून बचतीवरील व्याजदरात 2% कपात

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.