स्वस्तात फ्लॅट खरेदी करण्याची संधी; बँक ऑफ बडोदाकडून मालमत्तांचा लिलाव, जाणून घ्या माहिती

| Updated on: Sep 05, 2021 | 9:56 AM

Bank of Baroda | ही लिलाव प्रक्रिया दीर्घकाळा सुरु राहणार असून त्याची सुरुवात 8 सप्टेंबरपासून होणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही कोणत्या शहरांसाठी कधी लिलावप्रक्रिया पार पडेल, याची तपशीलवार माहिती जाणून घेऊ शकता.

स्वस्तात फ्लॅट खरेदी करण्याची संधी; बँक ऑफ बडोदाकडून मालमत्तांचा लिलाव, जाणून घ्या माहिती
एसबीआय योनोला टक्कर देणार बीओबी वर्ल्ड अॅप
Follow us on

मुंबई: देशातील प्रमुख सार्वजनिक बँकांपैकी एक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाकडून लवकरच मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात घरं, दुकानं आणि प्लॉट स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये असणाऱ्या मालमत्तांसाठी ही लिलाव प्रक्रिया पार पडेल. तुम्ही त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकता.

ही लिलाव प्रक्रिया दीर्घकाळा सुरु राहणार असून त्याची सुरुवात 8 सप्टेंबरपासून होणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही कोणत्या शहरांसाठी कधी लिलावप्रक्रिया पार पडेल, याची तपशीलवार माहिती जाणून घेऊ शकता.

साधारणत: ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठीतुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉझिट आणि केवायसी संबंधित बँकेच्या नजीकच्या शाखेत जमा करावे लागतात. तसेच लिलावत सहभागी होणाऱ्या व्यक्तीची डिजिटल सिग्नेचरही गरजेची असते. डिपॉझिट जमा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला बँकेकडून लिलावात सहभागी होण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जातो.

कोणत्या शहरांमध्ये मालमत्तांचा लिलाव?

बँक ऑफ बडोदाकडून कोणत्या शहरातील मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे, हे शोधणे अगदी सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर जावे लागेल. याशिवाय, https://www.bankofbaroda.in/e-auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट लिलाव प्रक्रियेच्या पेजवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्या विभागात आणि कोणत्या तारखेला मालमत्तांचा लिलाव होईल, याचा तपशील मिळेल.

ICICI बँकेच्या गृहकर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार?

गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी ठेवल्याने अनेक बँकांनी आता ग्राहकांना त्याचा फायदा द्यायला सुरुवात केली आहे. गृहकर्ज घेतलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना याचा फायदा मिळेल. आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जाचा व्याजदर कमी केला आहे. 1 सप्टेंबरपासून नवे व्याजदर लागू झाले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून याबद्दल कळवले आहे.

त्यानुसार 1 सप्टेंबरपासून गृहकर्जाच्या नव्या व्याजदरानुसार तुमच्या कर्जाचा मासिक हप्ता (EMI) ठरेल. ICICI बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गृहकर्जावर 7.25 टक्के इतका I-MCLR1Y लागू करण्यात आला आहे. सप्टेंबरपूर्वी MCLR च्या बेसिस पॉईंटनुसार ICICI बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर 7.7 टक्के इतका होता. 1 सप्टेंबरपासून तो 7.55 टक्के इतका असेल. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून आयसीआयसीआय बँकेतून गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा प्री- ईएमआयचा हप्ता किंचित का होईना पण कमी होईल.

संबंधित बातम्या:

शेअर बाजारात IOB चा भाव वधारला; PNB आणि बँक ऑफ बडोदाला टाकले मागे

Banks Privatization: सरकारी बँकांच्या खासगीकरणासाठी जोरदार हालचाली; केंद्र सरकारची उच्चस्तरीय बैठक

मोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात