AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 8 बँकांमध्ये खातं असेल तर होळीआधी करा महत्त्वाचं काम, अन्यथा नाही होणार व्यवहार

नवी दिल्ली : बँक ग्राहकांच्या (Bank Customer’s) दृष्टीने ही फार महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून या आठ बँकांच्या ग्राहकांना जुना चेकबुक, पासबुक आणि भारतीय वित्तीय सेवा कोड (IFSC) अवैध मिळतील, म्हणजे 1 एप्रिलपासून आपल्या जुन्या चेकबुकचा उपयोग होणार नाही. बँकांच्या धनादेशाद्वारे देयके बंद केली जातील. अशा परिस्थितीत जर आपले बँक खातेदेखील या सार्वजनिक […]

'या' 8 बँकांमध्ये खातं असेल तर होळीआधी करा महत्त्वाचं काम, अन्यथा नाही होणार व्यवहार
banks closed
| Edited By: | Updated on: Mar 26, 2021 | 8:25 AM
Share

नवी दिल्ली : बँक ग्राहकांच्या (Bank Customer’s) दृष्टीने ही फार महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून या आठ बँकांच्या ग्राहकांना जुना चेकबुक, पासबुक आणि भारतीय वित्तीय सेवा कोड (IFSC) अवैध मिळतील, म्हणजे 1 एप्रिलपासून आपल्या जुन्या चेकबुकचा उपयोग होणार नाही. बँकांच्या धनादेशाद्वारे देयके बंद केली जातील. अशा परिस्थितीत जर आपले बँक खातेदेखील या सार्वजनिक बँकांमध्ये असेल तर चेक बुक वेळेत बदला. आपल्याकडे फक्त 5 दिवस शिल्लक आहेत. यामध्ये आज शुक्रवार आणि सोमवार फक्त बँकेचे काम केले जाईल. यानंतर होळीच्या सुट्टीमुळे बँका बंद राहतील. (Banking News from 1 april 2021 cheque book passbook of 8 gov banks to become invalid)

बँकेशी त्वरित साधा संपर्क

अशा आठ बँका आहेत ज्या अलीकडे इतर बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत. बँकांच्या विलीनीकरणामुळे खातेदारांचे खाते क्रमांक, आयएफएससी आणि एमआयसीआर कोड बदलल्यामुळे बँकिंग सिस्टम 1 एप्रिल 2021 पासून जुने चेक नाकारेल. या बँकांची सर्व चेकबुक अवैध ठरतील. त्यामुळे या सर्व बँकांच्या ग्राहकांना त्वरित त्यांच्या शाखेत जाऊन नवीन चेकबुकसाठी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या बँका झाल्या विलीन

केंद्र सरकारने अनेक बँका विलीन केल्या आहेत. बँकांच्या वाढत्या एनपीए बोजामुळे केंद्र सरकारने बँकांना विलीन करण्याचा निर्णय घेतला. आता या बँकांच्या विलीनीकरणानंतर चेकबुक, पासबुक, आयएफएससी कोड इत्यादी बदलणार आहेत. आता या बँकांच्या ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत 1 एप्रिल 2021 पासून नवीन चेक बुक घ्यावे लागेल.

खरंतर, सिंडिकेट आणि कॅनरा बँक ग्राहकांच्या बाबतीत थोडा दिलासा मिळाला आहे. सिंडिकेट बँकेची सध्याची चेकबुक 30 जून 2021 पर्यंत वैध असेल. त्यानंतर नवीन चेकबुक घ्यावे लागेल. ज्या बँकांच्या जुन्या चेकबुक 1 एप्रिलपासून रद्द केल्या जातील. त्यापैकी देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. या बँकांच्या विलीनीकरणानंतर, त्यांची जुनी चेकबुक यापुढे 31 मार्चनंतर चालणार नाही.

विलीन झालेल्या बँकांची यादी-

– देना बँक आणि विजया बँक (Vijaya Bank) यांचे बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) विलीनीकरण करण्यात आले. 1 एप्रिल 2019 पासून ते प्रभावी झाले आहे.

– ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank of Commerce) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विलीन झाले.

– सिंडिकेट बँक (Syndicate Bank) कॅनरा बँकेत (Canara Bank) विलीन झाली आहे.

– आंध्र बँक (Andhra Bank) आणि कॉर्पोरेशन बँक (Corporation Bank) युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank of India) विलीन झाली आहे.

– अलाहाबाद बँक (Allahabad Bank) इंडियन बँकेत (Allahabad Bank) विलीन झाली आहे. (Banking News from 1 april 2021 cheque book passbook of 8 gov banks to become invalid)

संबंधित बातम्या – 

1 लाख गुंतवून होईल 1 लाख 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं

देशात पुन्हा लॉकडाउन होणार का? RBI गव्हर्नर यांनी दिली महत्त्वाची माहिती

SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

(Banking News from 1 april 2021 cheque book passbook of 8 gov banks to become invalid)

Follow Us
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप