AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holidays in August 2021 : आजपासून 5 दिवस बँका बंद, बँकेत जाण्यापूर्वी ही यादी नक्की पाहा

Bank Holidays August 2021 : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि 25 डिसेंबर ख्रिसमस या दिवशी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. दिवाळी, दसरा, ईद अशा प्रसंगी अनेक ठिकाणी बँकाही बंद असतात.

Bank Holidays in August 2021 : आजपासून 5 दिवस बँका बंद, बँकेत जाण्यापूर्वी ही यादी नक्की पाहा
bank holiday
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 12:42 PM
Share

नवी दिल्ली: जर तुम्ही या आठवड्यात काही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील विविध शहरांमधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका गुरुवारपासून सुमारे पाच दिवस बंद राहणार आहेत. बँक सुट्टी एकाच वेळी सर्व राज्यांना लागू होत नाही. सर्व ठिकाणी एकाच वेळी फक्त काही सुट्ट्या असतात.

रिझर्व्ह बँक वर्ष सुरू होण्यापूर्वी बँकांसाठी सुट्ट्यांची यादी करते जारी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि 25 डिसेंबर ख्रिसमस या दिवशी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. दिवाळी, दसरा, ईद अशा प्रसंगी अनेक ठिकाणी बँकाही बंद असतात. असेही काही सण आहेत, जेव्हा काही राज्यांच्या बँका बंद राहतात. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक वर्ष सुरू होण्यापूर्वी बँकांसाठी सुट्ट्यांची यादी जारी करते.

ऑगस्ट महिन्यात बँकांमध्ये 15 दिवसांच्या सुट्ट्या

रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार, ऑगस्ट महिन्यात बँकांमध्ये 15 दिवसांच्या सुट्ट्या होत्या. मोहरमच्या निमित्ताने नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनऊ आणि इतर अनेक राज्यांमध्ये 19 ऑगस्ट रोजी बँका बंद राहतील. पहिली ओणम साजरी करण्यासाठी बंगळुरू, चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरम येथील बँका 20 ऑगस्टला बंद राहतील. तिरुवनंतपुरम आणि कोचीसाठी 21 ऑगस्टला तिरुवोनमसाठी बँका बंद राहतील. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी बँका बंद असतात.

या दिवशी बँका बंद राहतील

?19 ऑगस्ट 2021 – मोहरम (आशुरा) – अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची आणि श्रीनगर येथे बँका बंद राहतील. ?20 ऑगस्ट 2021 – मोहरम / पहिला ओणम – बंगळुरू, चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरममधील सर्व बँका बंद राहतील. ?21 ऑगस्ट 2021 – तिरुवोनम – तिरुअनंतपुरम आणि कोची येथे बँका बंद राहतील. ?22 ऑगस्ट 2021 – देशभरातील सर्व बँका रविवारमुळे बंद राहतील. ?23 ऑगस्ट 2021 – श्री नारायण गुरु जयंती – तिरुअनंतपुरम आणि कोचीमध्ये बँका बंद राहतील. ?28 ऑगस्ट, 2021 – चौथा शनिवार – देशातील जवळपास सर्व शहरांमधील बँका बंद राहतील. ?29 ऑगस्ट 2021 – रविवारमुळे सर्व बँका बंद राहतील. ?30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी – अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोकमध्ये बँका बंद राहतील. ?31 ऑगस्ट 2021 – श्री कृष्ण अष्टमी – हैदराबादच्या बँका बंद राहतील.

संबंधित बातम्या

आता निवृत्तीचे वय वाढणार?, सरकारची योजना काय?, जाणून घ्या

तुमच्या PF खात्यात हा कॉलम भरला की नाही, लवकर करा हे काम अन्यथा पैसे अडकणार

Banks closed for 5 days from tomorrow 19 august 2021, important work do today, check this list before going to the bank

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.