AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकांनी घटवले गृहकर्जाचे व्याजदर , घराचे स्वप्न होणार पूर्ण, कोणत्या बँकेचे किती व्याजदर

आता घर खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत, ज्यामुळे घर घेण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकेल.

बँकांनी घटवले गृहकर्जाचे व्याजदर , घराचे स्वप्न होणार पूर्ण, कोणत्या बँकेचे किती व्याजदर
loan update
| Updated on: May 10, 2026 | 10:30 PM
Share

स्वत:च्या घरात राहण्याचा आनंद खूप मोठा असतो. छोटेसे का असेना पण स्वत:चे घर घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. तर अशा घर घेण्याची इच्छा असणाऱ्या लोकांचे घर खरेदीचे स्वप्न आता साकार होणार आहे. कारण, देशातील अनेक बँकांनी होम लोनचे व्याज दर मोठ्या प्रमाणात कमी करण्याची घोषणा केली आहे.

वास्तविक, गेल्यावर्षी २०२५ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा बदल करत होम लोनचे व्याज एकदम कमी केले होते. तसेच आरबीआयने रेपोरेट मध्ये केलेल्या एकूण १.२५ टक्क्यांच्या कपातीनंतर या वर्षाच्या मे महिन्याच्या होम लोन बाजारात मोठी हालचाल झाल्याचे पाहायला मिळाले. माहितीनुसार आता अलिकडच्या स्थितीचा विचार केला तर रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर झाला आहे.

तर दुसरीकडे सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB), इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने त्यांच्या MCLR दरात गेल्याच वर्षी जुलै महिन्यात ५ बेसिस पॉईंट्स म्हणजेच (BPS)ची मोठी कपात केली आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२५ पासून रेपोरेटमध्ये १०० bps ची कमी केली आहे. ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या बँकेने किती कपात केली ?

पंजाब नॅशनल बँक : पीएनबीने आपल्या MCLR दरात सर्व काळासाठी ५ bpsची कपात करुन सर्वांना हैराण केले आहे. पंजाब नॅशनल बँकेने एक वर्षांचे MCLR दर ८.९५ टक्के घटवून ८.९० टक्के पाहायला मिळत होते. तर तीन वर्षांचे MCLR दर ९.२५ टक्क्यांहून बदलून ९.२१ टक्के केले आहे.

इंडियन बँक : इंडियन बँकने केवळ आपल्या MCLR दरात काही काळासाठी ५ bps ची कपात केली आहे. तर नवीन दर ३ जुलै २०२५ पासून संपूर्णपणे लागू झालेले आहेत.

बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ इंडियाने त्यांच्या MCLR दरात सर्व अवधीसाठी ५ bps ची कपात केली आहे. माहितीनुसार नवीन दर १ जुलै २०२५ पासून लागू झाले आहेत आणि एक वर्षांचे MCLR दर,जे लोक दरासाठी खूपच अनिर्वाय म्हटले जातात. त्या ९.०५ टक्क्यांहून घटवून ९ टक्के केले आहेत. येथे तीन वर्षांचे MCLR दर ९.२ टक्क्यांनी घटवून ९.१५ टक्के केले आहेत.

बँक ऑफ बडोदा: बँक ऑफ बडोदाने देखील त्यांच्या होम लोन दरात मोठी कपात केली आहे. बँकेने व्याज दरांना संपूर्णपणे कमी करत ७.४५ टक्के रेटला निश्चित केले आहे. याशिवाय बँक ऑफ बडोदाने प्रोसेसिंग फीला देखील शून्य केले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये बँकेने लोनचे दर घटवले होते.

Top Bank Home Loan Interest Rates (As of May 2026)
  • Canara Bank: 7.10% – 10.25% p.a.
  • Bank of India: 7.10% – 10.25% p.a. (approx)
  • Central Bank of India: 7.10% – 9.15% p.a.
  • Indian Overseas Bank: 7.10% onwards
  • Bajaj Housing Finance: 7.15% – 11.90% p.a.
  • LIC Housing Finance: ~7.15% onwards
  • UCO Bank: 7.15% – 9.25% p.a.
  • HDFC Bank: 7.20%* p.a. onwards
  • Bank of Baroda: 7.20% – 8.95% p.a.
  • State Bank of India (SBI): 7.25% – 8.95% p.a.
  • Federal Bank: 7.30% – 10.70% p.a.
  • ICICI Bank: 7.45% p.a. onwards
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?