AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जून महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद, पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

जून महिन्यात तब्बल 12 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे, त्यामुळे बँक ग्राहकांची चांगलीच गैरसोय होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोण -कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत

जून महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद, पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2025 | 3:42 PM
Share

जर तुम्हालाही जून महिन्यात बँकेशी संबंधित काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जून महिन्यामध्ये बँका तब्बल 12 दिवस बंद राहणार आहे. या महिन्यात बँकांना बारा दिवस सुट्टी आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय, स्थानिक उत्सव आणि साप्ताहिक सुट्ट्या यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलेली जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी पाहून तुम्ही तुमच्या बँकेतील कामांचं नियोजन करू शकता.

जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी

1 जून (रविवार) आठवडी रजा 6 जून (शुक्रवार) बकरी ईद – केरळमध्ये बँक बंद 7 जून (शनिवार) बकरी ईद – गुजरात, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि केरळ सोडून इतर राज्यांमध्ये बँक बंद 8 जून (रविवार) आठवडी रजा 11 जून (बुधवार) संत कबीर जयंती (सिक्किम आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये बँक बंद 14 जून (शनिवार) दुसरा शनिवार – बँकांना सुट्टी 15 जून (रविवार) आठवडी रजा 22 जून (रविवार) आठवडी रजा 27 जून (शुक्रवार) रथ यात्रा / कांग (ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँक बंद 28 जून (शनिवार) चौथा शनिवार बँकांना सुट्टी 29 जून (रविवार) – आठवडी रजा 30 जून (सोमवार) -मिझोरम राज्यात बँकेला सुट्टी

दरम्यान जून महिन्यात जरी बँकांना बारा सुट्ट्या असल्या तरी देखील बाराही दिवस सर्व राज्यातील बँका एकाचवेळी बंद राहणार नाहीयेत, तेथील स्थानिक उत्सवानुसार काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे, तर काही राज्यांमध्ये त्या दिवशी बँका सुरू राहणार आहेत. अपवाद फक्त दुसरा आणि तिसरा शनिवार तसेच दर दविवारी असलेल्या साप्ताहिक सुट्टीचा या दिवशी मात्र सर्व बँका या बंद असतात. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक पाहूनच आपण आपल्या बँकेतील कामाचं नियोजन केल्यास आपला वेळ व खर्च दोन्हीही वाचेल.

एक जूनपासून अनेक नियमांमध्ये बदल  

दरम्यान एक जूनपासून बँकेशी संबंधित काही नियमांमध्ये देखील बदल होणार आहेत. ज्यामध्ये एफडीचा व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम हा थेट ग्राहकांवर होऊ शकतो, तसेच एटीएमच्या वापरावरील चार्ज देखील वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?