ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये OnePlus 9 आणि 9 Pro वर बंपर डिस्काऊंट, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

| Updated on: Sep 30, 2021 | 5:54 PM

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. येथे आपण स्मार्टफोनसह विविध उत्पादनांवर जबरदस्त सवलतींची अपेक्षा करू शकता.

ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये OnePlus 9 आणि 9 Pro वर बंपर डिस्काऊंट, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
OnePlus 9
Follow us on

मुंबई : Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. येथे आपण स्मार्टफोनसह विविध उत्पादनांवर जबरदस्त सवलतींची अपेक्षा करू शकता. कंपनीने वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 वरही शानदार ऑफर सादर केली आहे. कंपनीचे लेटेस्ट वनप्लस 9 सीरीजचे फ्लॅगशिप स्मार्टफोन या वर्षी मार्चमध्ये लाँच करण्यात आले होते आणि आता या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. (Bumper Discount on OnePlus 9 and OnePlus 9 Pro at Amazon Great Indian Festival Sale)

मिळालेल्या तपशीलांनुसार, वनप्लस 9 प्रो 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल. हा फोन भारतात 64,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे हे लक्षात घेता, आपण यावर सुमारे 15,000 रुपयांच्या डिस्काऊंटची अपेक्षा करू शकता. त्याचप्रमाणे, वनप्लस 9 अमेझॉन सेलदरम्यान 40,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 10,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह हा फोन अमेझॉनवर उपलब्ध होऊ शकतो.

ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने ग्रेट इंडियन फेस्टिव्हलदरम्यान वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 या दोन्हीवर उपलब्ध असलेल्या डील्सचा अद्याप खुलासा केलेला नाही. पण, या सवलतींचा टीझर पाहून एक गोष्ट कळली आहे की कंपनी वनप्लस 9 सिरीज कमी किंमतीत उपलब्ध करून देत आहे.

कसा आहे OnePlus 9 Pro?

OnePlus 9 Pro या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम दिले आहे. 256 जीबी पर्यंतची इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. या फोनमध्ये बॅक पॅनेलला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. 48MP Sony IMX789 प्रायमरी कॅमेरा सेंसर, सोबत 50MP Sony IMX766 सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला आहे. जो अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेंस सोबत येतो. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनचे खास फीचर्स म्हणजे यात ग्राहकांना Hasselblad Pro Mode मिळणार आहे. यामध्ये पॉवरसाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी Warp चार्ज 65T सह येते. तसेच 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. अवघ्या 29 मिनिटात या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज होते.

OnePlus 9 चे फीचर्स

हे स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम चालता. वनप्लस 9 मध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 20.9 आहे. रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे. वनप्लस 9 मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज स्पेस वाढवता येईल. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिली आहे. वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत 50 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Bumper Discount on OnePlus 9 and OnePlus 9 Pro at Amazon Great Indian Festival Sale)