AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगताय? इतके पेट्रोल मोफत, या सरकारी कंपनीच्या ऑफरने गजहब, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

Free Petrol Offer : महागाईमुळे सामान्य नागरिकांना मोठा झटका बसलेला आहे. सर्वच वस्तूंच्या किंमती महागल्या आहेत. पण या पेट्रोलियम कंपनीने एकदम खास ऑफर आणली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग लागली आहे. काय आहे ही ऑफर, किती रुपयांचे मिळते मोफत पेट्रोल?

काय सांगताय? इतके पेट्रोल मोफत, या सरकारी कंपनीच्या ऑफरने गजहब, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा
| Updated on: Feb 25, 2025 | 4:45 PM
Share

महागाईचा गेल्या काही वर्षांपासून कहर आहे. भाजीपाल्यापासून तर डाळधान्यापर्यंत अनेक वस्तू महागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलने तर काही वर्षांपूर्वी ग्राहकांच्या खिशाला तडाखा दिला आहे. या किंमती सध्या स्थिर आहेत. पण या पेट्रोलियम कंपनीने एकदम खास ऑफर आणली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग लागली आहे. काय आहे ही ऑफर, किती रुपयांचे मिळते मोफत पेट्रोल?

काय आहे ऑफर?

सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार ऑफर सुरू आहे. जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला 75 रुपयांचं पेट्रोल मोफत मिळेल. कंपनीची ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत चालेल. कसा मिळेल या ऑफरचा फायदा, जाणून घ्या.

भारत पेट्रोलियमचा स्थापना दिवसाचे औचित्य साधून ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. या ऑफरचा 28 फेब्रुवारी 2025 रोजीपर्यंत लाभ घेता येईल. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे. कंपनीचे कर्मचारी, डीलर्स, वितरक, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. तर ज्या राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशात या ऑफर्सवर कायदेशीर बंदी आहे, तिथे सुद्धा तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाही.

कसे मिळणार 75 रुपयात मोफत पेट्रोल?

भारत पेट्रोलियमच्या या ऑफरसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक पेट्रोल पंपावर नोंदवावा लागेल. या योजनेत भाग्यवानांना जवळपास 1000 रुपयांचा कॅशबॅक पण मिळू शकतो. ही ऑफर माहिती झाल्याने अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारक याविषयीची विचारणा करत आहे.

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना भारतीय पेट्रोल पंपावर पेट्रोल सोबतच MAK 4T इंजिन ऑईलचे कमीत कमी एक पॅक खरेदी करावे लागते. इंजिन ऑईल खरेदी करताच ग्राहकांना 75 रुपयांचे पेट्रोल मोफत आणि त्वरीत मिळेल.

इंजिन ऑईल तुम्ही मोफतपणे पेट्रोल पंपावर बदलवू शकता. इतकेच नाही. तर इंजिन ऑईलच्या डब्ब्यावर एक क्युआर कोड असेल तो स्कॅन केल्यावर 1,000 रुपयांपर्यंत कॅशबॅकचा फायदा सुद्धा होऊ शकतो.

एका मोबाईल क्रमांकवर या ऑफरचा एकदाच लाभ घेता येईल. एकदा ऑफरचा फायदा घेतल्यावर पुन्हा दुसऱ्या पेट्रोल पंपावर तुम्हाला ऑफरचा फायदा घेता येणार नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?