AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतानं पाकिस्तानचा बुकना पाडला, मग काय बॉसनं कर्मचाऱ्यांना दिलं सरप्राईज, तुम्ही म्हणाल आमचा मालक असा धक्का कधी देणार

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने पाकिस्तानचा बुकना पडला. आयआयटी बाबाचे 32 ही दात टीम इंडियाने घशात घातले. तर या मालकाने भारत जिंकला म्हणून कर्मचाऱ्यांना अनोखे गिफ्ट दिले.

भारतानं पाकिस्तानचा बुकना पाडला, मग काय बॉसनं कर्मचाऱ्यांना दिलं सरप्राईज, तुम्ही म्हणाल आमचा मालक असा धक्का कधी देणार
| Updated on: Feb 25, 2025 | 3:54 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने विजयाची घोडदौड सुरूच ठेवली. यजमान पाकिस्तानला आसमान दाखवलं. दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे देशात उत्साहाचे वातावरण होते. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा बुकना पाडल्याने देशभरात जल्लोष साजरा झाला. फटाके फोडण्यात आले. मिठाई वाटण्यात आली. उत्साह शिगेला पोहचला. इतकाच नाही तर या कंपनीच्या मालकाने कर्मचार्‍यांना अनोखे गिफ्ट दिले. त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे.

Rohit Gupta चे सरप्राईज गिफ्ट

भारत-पाकिस्तानचा सामना म्हटलं की अनेकांना कुठलंच काम करावसं वाटत नाही. सामना सकाळी अथवा दुपारी असला तर अनेक जण कार्यालयाला दांडी मारण्याचा प्रयत्न करतात. काही तरी बहाणा करून कार्यालयात जात नाहीत. तर काही जण बॉसच्या परवानगीने सामन्याचा आनंद घेतात. अथवा चोरून चोरून सामना बघतात. भारतीय संघाने मॅच जिंकल्यानंतर कॉलेज विद्या डॉट कॉमचे सहसंस्थापक रोहित गुप्ता यांनी एक भन्नाट निर्णय घेतला. त्यांनी कर्मचाऱ्यांना मोठा सुखद धक्का दिला.

भारत जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी या बॉसने कर्मचार्‍यांना पगारी अर्ध्या दिवसाची सुट्टी मंजूर केली. आपल्या कर्मचार्‍यांना टीम इंडियाचा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी मालकाने हा निर्णय जाहीर केला. त्यांनी लिंक्डइनवर याविषयीची पोस्ट पण शेअर केली. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना सुखद धक्का बसला.

आर यू रेडी टू पार्टी?

“कॉलेज विद्या टीम ही आनंद साजरा करण्याची वेळ आहे. भारत जिंकला आहे. सोमवारी तुम्हाला आगाऊ, अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. पार्टी करा, मस्त झोप काढा आणि कार्यालयात पहिल्या सत्रात येऊच नका. थेट दुसर्‍या सत्रात या. तुमची जबरदस्त कामगिरी दाखवा. भारताने सामना जिंकल्याने त्याचा आनंद साजरा करणे, हा तुमचा अधिकार आहे.” अशी पोस्ट रोहित यांनी लिंक्डईनवर पोस्ट केली आहे. इतकेच नाही तर पार्टी झाल्यावर दुसऱ्या दिवशी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत फोटोसेशन सुद्धा केले.

पाकिस्तानला झटका

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने पाकिस्तान संघाचा फडशा पाडला. पाकिस्तानला मोठा झटका बसला. अगोदर बांग्लादेश आणि नंतर पाकिस्तानला नमवून भारताने या टुर्नामेंटमध्ये टीम इंडिया लंबी रेस का घोडा असल्याचा मॅसेज दिला आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.