लोन एजेंटवरच जडला जीव, पळून जाऊन केलं लग्न, आता कहाणीत ट्विस्ट, कर्जदार पतीने घेतली एंट्री, कोर्टाचा फैसला काय
Loan Agent Viral Love Story : तर या प्रेमकहाणीत बायको प्रियकराच्या प्रेमाची कर्जदार झाली तर तिच्या प्रियकराने प्रेमाची वसूली केली आहे. या सर्व प्रकरणामुळे नवरा आणि नातेवाईक चांगलेच बेजार झाले आहेत. प्रकरण कोर्टात गेल्यावर असा निकाल समोर आला...

जगाच्या पाठीवर कुठं केव्हा काय होईल हे काय सांगता येत का? नशीबाचा भाग असतो म्हणून अनेक जण हसण्यावर नेतात. तर काही जण जगण्यावर नेतात. तर या कहाणीत सुद्धा असेच काहीसं घडलं आहे. या प्रेमकहाणीत बायको प्रियकराच्या प्रेमाची कर्जदार झाली तर तिच्या प्रियकराने प्रेमाची वसूली केली आहे. या सर्व प्रकरणामुळे नवरा आणि नातेवाईक चांगलेच बेजार झाले आहेत. प्रकरण कोर्टात गेल्यावर असा निकाल समोर आला…
बिहारमधील जुमई जिल्ह्यातील इंद्रा हिचे 2022 मध्ये लग्न झाले होते. तिच्या पतीने कर्ज घेतले होते. तर पती तिला काही किंमत देत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. तो तिला रोज मारहाण करत असे. या सर्व कटकटीला कंटाळून ती माहेरी निघून आली होती. दरम्यान पतीने कर्ज काढलेल्या फायनान्स कंपनीकडेच तिने कर्जासाठी अर्ज केला होता. तिथेच तिच्या जीवनात नवीन मोड आला.
तिच्याच जिल्ह्यातील जाजल या गावातील पवन कुमार याच्याशी तिची ओळख झाली. तो कर्ज वसुलीचे काम करतो. तो लोन रिकव्हरी एजंट आहे. दोघांमध्ये अनेकदा भेटीगाठी झाल्या. ओळख वाढली आणि दोघे प्रेमात पडले. तिने पवनला तिच्या लग्नाविषयी, पतीविषयी सर्व माहिती दिली. पवन याने तिला लग्नाचे वचनच दिले नाही तर 12 फेब्रुवारी रोजी त्यांना जमुई येथील प्रसिद्ध भूतनाथ मंदिरात जवळील मित्रांच्या साक्षीने इंद्रासोबत लग्न पण केले. हे लग्न सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यासोबतच पती आणि नातेवाईक पण जागे झाले.
पतीने सासूरवाडीकडील मंडळींना फोन करून त्यांचा अपमान केला. त्यामुळे नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पवन कुमार याने मुलीला जाळ्यात ओढून फसवल्याची तक्रार दिली. तेव्हापासून पोलीस या दोघांच्या मागावर होते. ते काही दिवस लपले. पण पोलिसांनी अखेर त्यांना शोधून कोर्टासमोर हजर केले.
कोर्टाचा निर्णय काय?
इंद्रा आणि पवन यांच्या लग्नामुळे धक्का बसलेले तिचे कुटुंबिय पोलीस ठाण्यात रोज जात होते. अखेर पोलिसांनी दोघांना न्यायालयासमोर हजर केले. ते जिल्ह्याच्याच ठिकाणी महावीर मंदिर परिसरात राहत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. न्यायालयात इंद्राने पतीसोबत न जाण्याचा आणि पवनसोबत राहण्याचा निर्णय सांगितला. आता कोर्टा काय निकाल देणार हे ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी झाली होती.
कोर्टाने प्रियकर पवन कुमार याच्या आई-वडिलांना पण न्यायालयात बोलावले. तीनही पक्षाचे लोक न्यायालयात हजर होते. पण तिचा पती यावेळी आला नाही. कोर्टाने इंद्राला पवनच्या आई-वडिलांसोबत जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर हे प्रेम प्रकरण पुन्हा चर्चेत आले.
