Gold Silver Price Today : गेल्या तीन दिवसांत सोने झरझर चढले, आज चांदीचा ग्राहकांना दिलासा

Gold Silver Price Today : गेल्या तीन दिवसांत सोने झरझर चढले असले तरी चांदीने मात्र ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजचा सोने-चांदीचा भाव काय?

Gold Silver Price Today : गेल्या तीन दिवसांत सोने झरझर चढले, आज चांदीचा ग्राहकांना दिलासा
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 11:31 AM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) चढउतार होत आहे. सोन्याने पुन्हा उसळी घेतली आहे. 3 मे रोजी सोन्याचा भाव 56,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्याने 800 रुपयांची भरारी घेतली होती. त्यानंतर सोन्याचा भाव सातत्याने वाढत गेला. 6 मे रोजी सोन्याच्या किंमतीत 700 रुपयांची घसरण झाली. 8 मे पासून भावात पुन्हा वाढ झाली. आज सकाळच्या सत्रात गुडरिटर्न्सनुसार, 11:22 मिनिटांतपर्यंत सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नव्हता.  22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 57,100 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 62,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या तीन दिवसांपासून चांदीच्या आघाडीवर शांतता आहे. चांदीच्या किंमती सातत्याने घसरत आहेत.

चांदीत आज घसरण 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर आज 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,100 रुपये होता. 10 मे रोजी सकाळच्या सत्रात चांदी किलोमागे 100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,000 रुपये झाला आहे. 11 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये आहे.

चांदीची रॉकेट भरारी यावर्षी चांदी आणि सोन्याच्या किंमतींनी जवळपास 11 टक्क्यांची उसळी घेतली. पण सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहक, खरेदीदारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांनी चांदीकडे मोर्चा वळविला आहे. चांदीत येत्या काही दिवसांत मोठी तेजी दिसू शकते. चांदीची मागणी वाढली आहे. चांदीच्या किंमती 9-12 महिन्यात वाढून 85,000 ते 90,000 रुपये प्रति किलोवर पोहचतील, असा अंदाज आहे. त्यामुळे चांदीच्या किंमतीत 20 टक्क्यांची तेजी दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

मेकिंग चार्ज कसा निश्चित होतो ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात.
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी.
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?.
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?.
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.