मोठी अपडेट! डॉलरच्या तुलनेत रुपया धराशायी; अजून कमी होणार EMI?

EMI Will Reduce?: डॉलरच्या तुलनेत यंदा रुपयाची सर्वात मोठी घसरण दिसून येत आहे. गेल्यावर्षी अखेरच्या व्यापारी सत्रात रुपया 85.64 स्तरावर बंद झाला होता. तेव्हापासून त्यात 4.02 रुपयांची मोठी घसरण दिसली. तुमचा ईएमआय खरंच होणार कमी?

मोठी अपडेट! डॉलरच्या तुलनेत रुपया धराशायी; अजून कमी होणार EMI?
रुपया आपटला, ईएमआय कमी होणार?
| Updated on: Nov 22, 2025 | 1:55 PM

शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये जवळपास 4 वर्षांतील सर्वात मोठी घसरण आली आहे. त्यामुळे रुपया 89.66 च्या स्तरावर बंद झाला. हा रुपयांचा आतापर्यंतचा सर्वात निच्चांक आहे. रुपयाच्या घसरणीचा चलन व्यापाराला मोठा धसका बसला आहे. रुपयात अजून मोठी घसरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही तज्ज्ञांच्या मते रुपया वर्षाअखेर 91 च्या स्तरावर जाऊन पोहचले. यंदा रुपयात 4.50 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली. तर दुसऱ्या हप्त्यात 1.21 टक्क्यांची घसरण दिसली. त्याचा परिणाम आता महागाईपासून ते तुमच्या कर्जाच्या ईएमआयवर दिसून येण्याची शक्यता आहे.

रुपयामध्ये 4 वर्षातील सर्वात मोठी घसरण

स्थानिक आणि वैश्विक शेअर बाजारात मोठे विक्री सत्र सुरू आहे. व्यापार संबंधी अनिश्चितता आहे. तर परदेशी चलन बाजारात डॉलरला मोठी मागणी आली आहे. शुक्रवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 98 पैशांनी घसरून 89.66 च्या सर्वात निच्चांकी स्तरावर बंद झाला. बाजारात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान शेअर्सविषयीच्या चिंतेने पण गुंतवणूकदारांना प्रभावित केले आहे.

रुपयाच्या घसरणीने अनेक स्वप्नांचा चुराडा?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ?

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाच्या आयातदार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मोठी घसरण झाली तर भारतात इंधन दर वाढण्याची भीती व्यक्त हो आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किंमती 62 डॉलरच्या जवळपास आहे. जर डॉलर अजून मजबूत झाला आणि रुपया घसरला तर स्वस्त कच्चे तेल भारताला महागात पडेल आणि किंमतीत वाढ होईल.

महागाई वाढीचा धोका

रुपयाच्या घसरणीमुळे महागाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भारत ज्या ज्या वस्तू आयात करतो, त्यासाठी भारताला अधिक किंमत मोजावी लागेल. त्यामुळे परदेशातून आयात होणाऱ्या सर्वच वस्तू महागतील. त्यामुळे एकूणच महागाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशात महागाई 1 टक्क्यांपेक्षा कमी दिसत आहे.

EMI कसा कमी होईल?

काही दिवसांपूर्वी बाजारातील तज्ज्ञ डिसेंबर महिन्यात आरबीआय रेपो दरात 0.25 टक्के ते 0.50 टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता रुपयानेच मैदान सोडल्याने या चर्चांना विराम मिळाला आहे. बाजारातील अनिश्चितता आणि महागाईच्या कारणामुळे कदाचित रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अथवा रेपो दर जैसे थे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे ईएमआय कमी होण्याचे स्वप्न भंगणार आहे.