AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bitcoin ने रचला इतिहास; पहिल्यांदाच 1 लाख डॉलरचा टप्पा पार, बाजारात चालले ट्रम्प कार्ड

Bitcoin Made a History : जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनने पुन्हा एकदा विक्रम रचला आहे. बिटकॉईनने एक लाख डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यापासून बिटकॉईनच्या किंमतींना उसळी आली आहे. एका महिन्यात बिटकॉईनच्या किंमतीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ दिसली आहे.

Bitcoin ने रचला इतिहास; पहिल्यांदाच 1 लाख डॉलरचा टप्पा पार, बाजारात चालले ट्रम्प कार्ड
क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन
| Updated on: Dec 05, 2024 | 11:30 AM
Share

जुलै महिन्याच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प हे नॅशविले बिटकॉईन कॉन्फ्ररन्समध्ये पोहचले होते. त्यावेळीच त्यांनी जगाला नवीन संदेश दिला होता. सत्तेत परतलो तर अमेरिकेला जगाची क्रिप्टो कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी या परिषदेत केली होती. त्यावेवळी बिटकॉईनच्या किंमतीत 4 टक्क्यांपेक्षा अधिकची उसळी दिसली होती. तेव्हा बिटकॉईन 67 हजार डॉलरच्या घरात पोहचला होता. अमेरिकन निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमत मिळवले. आता 20 जानेवारी 2025 रोजी ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. त्यापूर्वीच क्रिप्टोकरन्सीत बिटकॉईनने नवीन इतिहास रचला. बिटकॉईनची किंमत एक लाख डॉलरच्या घरात पोहचल्या. 5 नोव्हेंबरपासून बिटकॉईनच्या किंमतीत 50 टक्क्यांहून अधिकची उसळी दिसली आहे. सध्या काय आहे बिटकॉईनची किंमत?

Bitcoin एक लाख डॉलरच्या पुढे

कॉईन मार्केटच्या आकडेवारीनुसार, बिटकॉईनचा भाव 7 टक्क्यांच्या तेजीसह 102,656.65 डॉलरवर व्यापार करत आहे. व्यापारी सत्रा दरम्यान बिटकॉईनच किंमत 103,900.47 डॉलरवर पोहचली आहे. बिटकॉईनच्या किंमतीत मोठी तेजी दिसली आहे. बिटकॉईनचा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात बिटकॉईनचा भाव 94,660.52 डॉलरसह निच्चांकावर पण पोहचला होता. बिटकॉईनचा भाव लवकरच 1.25 लाख डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी दिनी 20 जानेवारी 2025 रोजी बिटकॉईन हा ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतो.

एका महिन्यात 50 टक्क्यांचा फायदा

जेव्हापासून अमेरिकेमधील निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. तेव्हापासून जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली. म्हणजे बिटकॉईनच्या भावात 50 टक्क्यांहून अधिकची उसळी आली आहे. गेल्या एका आठवड्यापासून बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर एका वर्षात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 145 टक्क्यांहून अधिकची कमाई करुन दिली आहे. या वर्षाअखेर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  तर दुसरीकडे एलॉन मस्क यांच्या आवडत्या क्रिप्टोकरन्सनीकडे सुद्धा सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. मस्क याने अमेरिकेमधील निवडणुकीत डॉगकॉईन आणि ट्रम्प यांचे जाहीर समर्थन केले होते. मस्क याच्या संपत्तीत आणि चलनात मोठी वाढ झाली आहे. आता डॉगकॉईन अजून भरारी घेण्याची शक्यता आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी