भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर!

| Updated on: Nov 22, 2020 | 4:28 PM

गेल्या दोन महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स जवळपास 20 टक्क्यांनी घटले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत 10 लोकांच्या यादीतून बाहेर गेले आहेत.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर!
Follow us on

नवी दिल्ली: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्स इंड्रस्ट्रिजचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सने (Bloomberg Billionaires Index) जाहीर केलेल्या माहितीनुसार मुकेश अंबाने हे 72.2 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11व्या स्थानावर आले आहेत. टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत अॅमेझॉनच्या जेफ बेजोस हे 183 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पहिला क्रमांकावर आहेत. तर 10 व्या क्रमांकावर फ्रँक्वाइज बेट्टेकोर्ट मेयर्स आहेत. (Mukesh Ambani out of list of world’s top 10 richest people)

जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी

  1. जेफ बेजोस – 183 अब्ज डॉलर
  2. बिल गेट्स – 128 अब्ज डॉलर
  3. अॅलेन मस्क – 121 अब्ज डॉलर
  4. बर्नार्ड अर्नाल्ट – 105 अब्ज डॉलर
  5. मार्क जुकरबर्ग – 102 अब्ज डॉलर
  6. वॉरेन बफे – 85.9 अब्ज डॉलर
  7. लॅरी पेज – 81.6 अब्ज डॉलर
  8. सर्गी ब्रिन – 79 अब्ज डॉलर
  9. स्टीव बाल्मर – 76.2 अब्ज डॉलर
  10. फ्रँक्वाइज बेट्टेकोर्ट मेयर्स – 73.7 अब्ज डॉलर

मुकेश अंबानींना मोठा फटका

गेल्या दोन महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स जवळपास 20 टक्क्यांनी घटले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत 10 लोकांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा मार्केट कॅप 16 लाख 01 हजार 791.46 कोटी रुपयांवर 12 लाख 84 हजार 246.18 कोटी रुपये झाला आहे. म्हणजे 3.17 लाख कोटी रुपयांनी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये घट झाली आहे. ऑगस्टमध्ये मुकेश अंबानी हे युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले होते.

मुकेश अंबानी यांचा दिवाळी धमाका

मुकेश अंबानी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अंबानी यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांच्या क्लीन एनर्जीच्या बेकथ्रू एनर्जी वेंचर्स लिमिटेड कंपनीत 5 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 375 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अंबानी यांच्याआधी उद्योगपती जेफ बेजोस, मायकल ब्लूमबर्ग, जॅकमा, मासायोशी सोन यासारख्या दिग्गजांनी ब्रेकथ्रू एनर्जी वेंचर्समध्ये गुंतवणूक केली आहे.

रिलायन्स कंपनीची सब्सिडीयरी विकून गुंतवणूक गोळा

बिल गेट्स यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सब्सिडीयरीचा वाटा वाटा विकून पैसा गोळा करत आहे. आरआयएलने आतापर्यंत जियो प्लेटफॉर्म्समधून 32.96 टक्क्याचा वाटा विकून 1.52 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमधून 10.09 टक्के सब्सिडीयरीचा वाटा विकून जवळपास 47 हजार कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत. या पैशांचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापर केला जात आहे.

संबंधित बातम्या:

मुकेश अंबानी यांचा दिवाळी धमाका, देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

50 लाख ते 200 अब्ज डॉलरपर्यंतचा प्रवास, मुकेश अंबानींच्या यशाचं रहस्य उघड

Corona Virus : भारत गंभीर टप्प्यावर, आता हलगर्जीपणा नको; मुकेश अंबानींचं मोठं विधान

Mukesh Ambani out of list of world’s top 10 richest people