मुकेश अंबानी यांचा दिवाळी धमाका, देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देणे जेणेकरुन ते आपले उत्पन्न वाढवू शकतील, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे (Mukesh Ambani invest in bill gates green venture company).

मुकेश अंबानी यांचा दिवाळी धमाका, देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 4:19 PM

मुंबई : रिलायन्स कंपनीचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अंबानी यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांच्या क्लीन एनर्जीच्या बेकथ्रू एनर्जी वेंचर्स लिमिटेड कंपनीत 5 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 375 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे (Mukesh Ambani invest in bill gates green venture company).

विशेष म्हणजे अंबानी यांच्याआधी उद्योगपती जेफ बेजोस, मायकल ब्लूमबर्ग, जॅकमा, मासायोशी सोन यासारख्या दिग्गजांनी ब्रेकथ्रू एनर्जी वेंचर्समध्ये गुंतवणूक केली आहे (Mukesh Ambani invest in bill gates green venture company).

बिल गेट्स यांची ग्रीन वेंचर्स कंपनी ऊर्जा आणि कृषी तंत्रज्ञानाच्या विकासात गुंतवणूक करुन हवामान संकटावर उपाय शोधण्यासाठी काम करते. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देणे जेणेकरुन ते आपले उत्पन्न वाढवू शकतील, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाचा भारतातील शेतकऱ्यांनाही फायदा होईल.

रिलायन्स इंडस्ट्रीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या या प्रयोगाचा फायदा संपूर्ण देशाला होईलच त्याबरोबर गुंतवणुकदारांनाही होईल. या प्रकल्पात गुंतवणुकदारांना चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, अशाप्रकारच्या गुंतवणुकीसाठी अद्याप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी देण्यात आलेली नाही. ही गुंतवणूक रिलेटेड पार्टी ट्रान्जेक्शन अंतर्गत होत नाही. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्टीज लिमिटेडच्या कुठल्याही प्रमोटर, प्रमोटर ग्रुप किंवा ग्रुप कंपनीचे कोणतेही हीत नाही, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

रिलायन्स कंपनीची सब्सिडीयरी विकून गुंतवणूक गोळा

बिल गेट्स यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सब्सिडीयरीचा वाटा वाटा विकून पैसा गोळा करत आहे. आरआयएलने आतापर्यंत जियो प्लेटफॉर्म्समधून 32.96 टक्क्याचा वाटा विकून 1.52 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमधून 10.09 टक्के सब्सिडीयरीचा वाटा विकून जवळपास 47 हजार कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत. या पैशांचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापर केला जात आहे.

हेही वाचा :

रिलायन्स जियोचा सुपरफास्ट वेब ब्राऊझर JioPages लाँच, मराठीसह आठ भारतीय भाषा उपलब्ध

Non Stop LIVE Update
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.