Gold Price: आजी सोनियाचा दिनु… 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80,000? रशिया मोठा खेळ करणार? कुणाचा मोठा दावा

Gold Price crash: सोन्याच्या किंमती घसरत असल्या तरी गेल्या दोन वर्षात सोन्याने मोठी मुसंडी मारली आहे. लाखाचा टप्पा पार करून सोन्याची दोन लाखांकडे घोडदौड सुरू झाली आहे. पण सोन्याचा भाव थेट लाखाच्याही खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Gold Price: आजी सोनियाचा दिनु... 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80,000? रशिया मोठा खेळ करणार? कुणाचा मोठा दावा
सोने स्वस्त होणार?
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 24, 2026 | 3:19 PM

Gold Price crash: बाजारातील तज्ज्ञांच्या मते जागतिक अस्थिरता आणि जगभरातील केंद्रीय बँकांकडून करण्यात येणारी सोन्याची मोठी खरेदी यामुळे गेल्या काही महिन्यात सोन्याचा भाव रॉकेटसारखा वधारला. आकडेवारीनुसार, ब्रिक्स (BRICS) देश ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेत गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक सोने खरेदी करण्यात आली. जगभरात जी सोने खरेदी झाली. त्यातील जवळपास 50% भाग हा एकट्या या पाच देशांनी खरेदी केला आहे. अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि किंमतीत मोठी वाढ झाली.

रशियाची भूमिका आणि सोने स्वस्त

सध्या भू-राजकीय घडामोडी पुन्हा वाढल्या आहेत. अमेरिका -इराण युद्धाचा भडका उडण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होईल. अमेरिका आणि रशियाचे संबंध ताणल्या गेले. रशियाने अमेरिकन डॉलरचा वापर पूर्णपणे थांबवला आणि सोने खरेदीवर जोर दिला. पण एका गुप्त करारानुसार, येत्या काही दिवसात रशिया डॉलरचा पुन्हा वापर वाढवणार असल्याचे समोर येत आहे. असे जर झाले तर हा मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. सोन्याच्या किंमती धपकन खाली येतील.

आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा व्यापारासाठी जर रशियाने डॉलरमध्ये व्यवहाराला मान्यता दिली तर मोठा गेम होईल. रशिया सोने बाजारात उतरवेल. रशिया मोठ्या प्रमाणात सोने जागतिक बाजारात विक्री करेल. अशा स्थितीत जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती कोसळतील. परिणामी प्रत्येक देशात सोन्याचा पुरवठा वाढेल आणि त्याही देशात सोन्याच्या किंमती आपटतील.

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार?

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प हरएक प्रयत्न करताना दिसून येत आहे. इराणभोवती युद्धाचे ढग हा त्याचाच एक भाग मानल्या जात आहे. तर रशिया आणि युक्रेन युद्ध थांबले तर जागतिक बाजारातील अस्थिरता संपुष्टात येईल. जेव्हा जगात शांतता नांदते. तेव्हा सोन्याच्या किंमती घसरतात. गेल्या काही दिवसात चीन, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेने सोन्याची खरेदी वाढवली होती. पण गेल्या काही दिवसांपासून या देशाने सोन्याची खरेदी कमी केल्याचे संकेत समोर येत आहेत. याधातुची मागणी घटल्यास किंमतीवर त्याचा थेट परिणाम होईल.

Bloomberg चा तो मोठा दावा

Bloomberg ने एक धक्कादायक दावा केला आहे. त्यानुसार, भारतात लवकरच 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 70,000 ते 80,000 रुपयांवर घसरतील. अर्थात ही घसरण एका दिवसात होणार नाही. पण जागतिक बदलानुसार या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते 2027 पर्यंत जागतिक बाजारात स्थिरता येईल आणि सोन्याच्या किंमती एक लाखाच्या आत येतील. हा ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी एक प्रकारचा इशाराही मानल्या जात आहे.