AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs CSK : समीर रिझवीची निर्णायक खेळी, चेन्नईसमोर 156 धावांचं आव्हान, दिल्ली रोखणार?

Delhi Capitals vs Chennai Super Kings 1st Innings Highlight : दिल्ली कॅपिट्ल्सला आपल्या घरच्या मैदानात 8 च्या रनरेटही धावा करता आल्या नाहीत. चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीला 155 धावांव रोखण्यात यश मिळवलं.

DC vs CSK : समीर रिझवीची निर्णायक खेळी, चेन्नईसमोर 156 धावांचं आव्हान, दिल्ली रोखणार?
Tristan Stubbs and Sameer RizviImage Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 05, 2026 | 10:02 PM
Share

समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने अखेरच्या क्षणी केलेल्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सला चेन्नई सुपर किंग्ससमोर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 48 व्या सामन्यात सन्मानजनक आव्हान ठेवता आलं आहे. दिल्लीने चेन्नईसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावनू 155 धावा केल्या. दिल्लीसाठी कॅप्टन अक्षर पटेल याचा अपवाद वगळता इतर 7 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांचा अपवाद वगळता एकालाही दिल्लीसाठी मोठी खेळी करता आली नाही. आता दिल्लीचे गोलंदाज 155 रन्सचं अरुण जेटली स्टेडियममध्ये कशाप्रकारे बचाव करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. या मैदानात 2026 वर्षात 4 पैकी 3 सामन्यांत विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झालाय. मात्र त्यानंतरही अक्षरने बॅटिंगचा निर्णय घेतला. अक्षरचा बॅटिंगचा निर्णय चुकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

दिल्लीची बॅटिंग

दिल्लीच्या पहिल्या 4 फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र चौघांपैकी एकालाही 20 हा आकडा गाठता आला नाही. पाथुम निसांका याने 19 धावा केल्या. नितीश राणा याने 15 धावांचं योगदान दिलं. केएल राहुल याने 12 रन्स केल्या. तर करुण नायर याने 13 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कॅप्टन अक्षर पटेल याने 2 धावा केल्या. अक्षर आऊट झाल्याने दिल्लीची स्थिती 11 ओव्हरमध्ये 5 आऊट 69 अशी झाली. मात्र त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी या दोघांनी कमाल केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी आणि या सामन्यातील सर्वात मोठी भागीदारी केली. दोघांनी 47 बॉलमध्ये 65 रन्स केल्या.

लाईव्ह स्कोअरकार्ड

ट्रिस्टन आऊट झाल्याने ही भागीदारी मोडीत निघाली. ट्रिस्टनने 31 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह 38 रन्स केल्या. तर आशुतोष शर्मा 14 धावांवर रनआऊट झाला. तर समीर रिझवी सर्वाधिक धावा करुन नाबाद परतला. समीरने 24 बॉलमध्ये 166.67 च्या स्ट्राईक रेटने 40 रन्स केल्या. समीरने या खेळीत 4 षटकार लगावले. चेन्नईसाठी नूर अहमद याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर अकील हौसेन, मुकेश चौधरी, गुरजनप्रीत सिंग आणि जेमी ओव्हरटन या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं