AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan App Alert | लोन अॅपवरुन कर्ज घेताय? मग नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो काय म्हणतो ते तर वाचा..

Loan App Alert | कर्ज घेणे हे आता अत्यंत सोपं झाले आहे. परंतु, त्याची परतफेड आणि व्याजदर मात्र तुम्हाला गुरफटल्याशिवाय राहत नाही. तेव्हा वाचाच

Loan App Alert | लोन अॅपवरुन कर्ज घेताय? मग नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो काय म्हणतो ते तर वाचा..
कर्ज की फासImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 27, 2022 | 9:00 AM
Share

Loan App Alert | कर्ज (Loan) घेणे हे आता अत्यंत सोपं झाले आहे. परंतु, त्याची परतफेड आणि व्याजदर (Interest Rate) मात्र तुम्हाला गुरफटल्याशिवाय राहत नाही. अनेक वेळा ग्राहक (Customer) कर्ज घेण्याचा सपाटा लावतात. कधी कधी अगोदरचे कर्ज फेडण्यासाठीही दुसरे कर्ज घेण्यात येते. ते विविध अॅप्सवरून (Loan Apps) अनेक कर्ज घेतात. त्यातच नोकरी गमवली, तर दुसऱ्या नोकरीच्या शोधापर्यंत तात्पुरते म्हणत कर्ज घेतल्या जाते. पुढे ईएमआय (EMI) भरायला जड जाते. लोन अॅप्सचे रिकव्हरी एजंट (Recover Agent) ग्राहकांच्या मागेच पडत नाहीत तर ते त्यांच्या कुटुंबालाही सोडत नाहीत. हे दृष्टचक्र काही पिच्छा सोडत नाही. यात अघटीत घटना घडतात. जपून ठेवलेले सोनं, हक्काची माणसं हिरवातात आणि कर्जाचा मोह माणसाला वाईट गोष्टी ही करायला भाग पाडतो. आपल्या आजुबाजूला, माध्यमातून या गोष्टींचा सतत राबता आपण वाचतोच.

हे आकडे भयावह

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB)आकडेवारीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भावात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. हातचा रोजगार गेला. त्यातील अनेकांनी झटपट लोन अॅपच्या सहायाने कर्ज घेतले. काही दिवस मजेत गेले. पण नंतर ईएमआय भरणे त्यांना जड गेले. कोरोनानंतर आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी सुमारे 25 हजार जण असे होते, ज्यांनी नोकरी गमावल्यानंतर या झटपट अॅप्सच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. अनेक आत्महत्यांच्यामागे कर्ज हेही प्रमुख कारण असते. त्यामुळे अत्यंत निकड असेल तर कर्ज घ्या. पण खर्चावरही नियंत्रण ठेवा तर कर्ज परतफेड करता येईल.

डिजिटल कर्जाचा फास

डिजिटल कर्ज देण्याबाबत कार्यगटाच्या शिफारशी भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक केल्या आहेत. या मोबाईलद्वारे झटपट कर्ज देणाऱ्या अॅपवर आरबीआयचे लक्ष आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि कर्ज वाटप प्रकरणांचाही अभ्यास करण्यात येत आहे. हे अॅप ग्राहकाची खरेदी वर्तवणुकीचा अभ्यास करुन जाहिरातींचा भडिमार करतात. त्यामुळे बऱ्याचदा हौसमज्जेसाठीही कर्ज घेण्यात येत असल्याचे दिसून येते. यासंबंधी आरबीआयने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहे. त्यानुसार, आता अनियंत्रीत कर्ज वाटपावर चाप बसला आहे. फिनटेक कंपन्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहे. खर्च मर्यादा पाहून कर्ज देण्यावरही खल सुरु आहे.

उगा कर्जाचा फंदा कशाला?

असे असले तरी अनेक जण विविध ठिकाणाहून कर्ज घेतात. काही खासगी बँका, वित्तीय अॅप तर सरकारी बँका यामधून एकाच व्यक्तीने कर्ज घेतल्याचे उघड होते. त्यामुळे एकापेक्षा जास्त कर्ज घेत असाल तर पैशांचा योग्य वापर करणे आवश्यक ठरते. उगा कर्जाच्या पंदात कशाला पडायचे हा निर्णय सर्वस्वी ग्राहकाचा असतो. त्याने त्याची आणि कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. कर्जाच्या रक्कमेतून कोणीही घर चालवू शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

क्षमता ही तपासा

बऱ्याचदा भराभर कर्ज घेतल्या जाते. पण परतफेड करताना दमछाक होते. त्यावेळी गहाण वस्तू एकतर ताब्यातून जातात अथवा किडूकमिडूक विकून कर्ज फेडण्याशिवाय पर्याय राहत नाही. मालमत्ता खरेदीसाठी अथवा घर खरेदीसाठी कर्ज घेणे ही वेगळी बाब आहे. पण पर्यटन, मौजमजा अथवा इतर वायफळ खर्चासाठी भरमसाठ कर्ज घेणे हा स्वतःहून गळ्याला फास लावण्यासारखा प्रकार ठरू शकतो.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.