AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2026 : लखपती दीदीनंतर आता केंद्र सरकारची नवी योजना, कोट्यावधी महिलांना लॉटरी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी 'सी-मार्ट' योजनेची मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी स्वस्त कर्ज आणि विशेष पाठबळ मिळणार असून, लखपति दीदी योजनेला आता नवीन बळ मिळाले आहे.

Budget 2026 : लखपती दीदीनंतर आता केंद्र सरकारची नवी योजना, कोट्यावधी महिलांना लॉटरी
Nirmala Sitharaman women scheme
| Updated on: Feb 01, 2026 | 12:51 PM
Share

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून देशातील महिलांना मोठी भेट दिली आहे. शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्यांवर लक्ष केंद्रित करतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सी-मार्ट (C-Mart) या नव्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमुळे महिला उद्योजकांना आता त्यांच्या व्यवसायात पाय रोवण्यासाठी सरकारी पाठबळ मिळणार आहे.

सी-मार्ट योजना नेमकी काय?

गेल्या वर्षी केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपति दीदी या योजनेची सुरुवात केली होती. याच मोहिमेला पुढच्या टप्प्यावर नेत आता सी-मार्ट योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांनी सुरू केलेल्या छोट्या व्यवसायांना स्थिरता (Stability) मिळवून देणे असा असणार आहे.

योजनेचे मुख्य फायदे काय?

१. कमी व्याजदरात कर्ज: महिलांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आता भांडवलाची चिंता करण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

२. बिझनेस सपोर्ट: केवळ आर्थिक मदतच नाही, तर व्यवसायाचे नियोजन आणि तो यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक व स्ट्रक्चरल सहकार्य या योजनेद्वारे दिले जाईल.

३. उत्पादनांना बाजारपेठ: महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठ्या स्तरावर विक्रीसाठी व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सी-मार्ट करणार आहे.

अर्थमंत्र्यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील बचत गटांशी जोडलेल्या महिलांना आणि वैयक्तिक उद्योजिकांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

लहान उद्योगांना प्रगतीसाठी मिळणार मोठी ताकद

2026 च्या अर्थसंकल्पात उत्पादन, निर्यात आणि आत्मनिर्भर भारत अभियानावर विशेष भर दिला आहे. जे जुने कारखाने किंवा उद्योग काही कारणास्तव बंद पडले होते, त्यांना पुन्हा सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. जेणेकरून रोजगाराच्या संधी वाढतील. विशेष म्हणजे, लहान उद्योगांना (MSME) पुढे नेण्यासाठी सरकारने १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांना प्रगती करून मुख्य प्रवाहात येणे सोपे होणार आहे.

अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आणखी २ हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. तसेच जुन्या औद्योगिक क्षेत्रांना पुन्हा ऊर्जा देण्यासाठी आणि लहान उद्योगांना बळकट करण्यासाठी ७ हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे. याशिवाय, हातमाग आणि पारंपारिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी हॅण्डलूम योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, MSME आणि औद्योगिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी आगामी काळात ३५० पेक्षा जास्त सुधारणा लागू केल्या जातील, असा दावा सरकारने केला आहे.

Follow Us
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?