Business Ideas: कशाला ऑफिसची झंझट, घरातूनच सुरु करा बिझनेस, दरमहा तुफान कमाई, महिलांना घर बसल्या लॉटरी

Business Ideas For Housewife: कार्यालय आणि घर अशी महिलांची मोठी तारंबळ उडते. काही महिला व्यवसायाला प्राधान्य देतात. त्यांना ऑफिसची झंझट नको असते. घरातूनच त्यांना हा बिझनेस सुरू करता येतो. त्यातून दरमहा तुफान कमाई करता येते.

Business Ideas: कशाला ऑफिसची झंझट, घरातूनच सुरु करा बिझनेस, दरमहा तुफान कमाई, महिलांना घर बसल्या लॉटरी
घरबसल्या करा कमाई
Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 10, 2025 | 3:10 PM

Business Ideas: सध्या अनेक लोक घरातूनच विविध प्रकारचे व्यवसाय करतात. त्यातून त्यांची चांगली कमाई होते. अनेक महिलांना ऑफिसची झंझट नको असते. त्यांना घरातूनच काहीतरी व्यवसाय सुरू करावा वाटतो. नोकरीमुळे ओढताण होते. त्यापेक्षा घरातील व्यवसायातून कमाई करता येऊ शकते. महिलांना या छोट्या बिझनेसमधून घरातूनच व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. कमी बजेटच्या या व्यवसायातून त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. कोणते आहेत हे छोटे व्यवसाय?

Cake Shoppy

आजकाल कोणतेही सेलिब्रेशन हे पार्टीशिवाय पूर्ण होत नाही. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, परीक्षेतील यश, कार्यालयातील पदोन्नती अशा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी केक लागतोच. त्यातही घरगुती केकला अधिक महत्त्व आलं आहे. त्यामुळे तुम्ही केक शॉपी अथवा घरगुती केक तयार करुन देण्याचा व्यवसाय चांगला चालू शकतो. या बिझनेसमध्ये फार मोठं भांडवल लागत नाही. तुमच्या गुणवत्तेनुसार आपोआप तुमची प्रसिद्धी होते. हे कमाईचं चांगलं माध्यम आहे.

बुटिक शॉप

महिलांमध्ये बुटिक शॉप अत्यंत लोकप्रिय आहे. अनेक महिला या बुटिक शॉपमधूनच कपडे खरेदी करतात. येथे त्यांच्या मनानुसार आणि पसंतीनुसार कपडे खरेदी आणि शिलाई करता येते. त्यावर विविध प्रकारचे वर्क करता येते. हा बिझनेस आता तालुका आणि बाजार गावातही बुटिक शॉप आता उघडू लागले आहेत.

ऑनलाईन ट्यूशन

घरगुती शिकवणी हा ही चांगला व्यवसाय आहे. अनेक महिला यामध्ये गुंतल्या आहेत. पण गेल्या काही दिवसात तंत्रज्ञान प्रगत झाल्याने ऑनलाईन ट्यूशन हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. आता अनेक ऑनलाईन स्टडिज प्लॅटफॉर्म आले आहेत. त्यामुळे महिलांना घरबसल्या शिकवण्याची संधी मिळते. महिला आवडीचा कोणताही विषय शिकवून त्यामाध्यमातून कमाई करू शकतात.

टिफिन सेवा, खाणावळ

अनेक महिला या सुगरण असतात. त्यांच्या हाताला जणू चव असते. त्या काहीही अन्नपदार्थ तयार करो , त्याचे कायम कौतुक होते. अशा खास सुगरणींसाठी हा व्यवसाय चांगला ठरू शकतो. अनेक शहरात बाहेरगावचे विद्यार्थी, नोकरदार यांच्या जेवणाची अबाळ होते. तेव्हा ते टिफिन सेवा आणि खाणावळीच्या माध्यमातून कमाई करू शकतात. हा पण एक चांगला व्यवसाय ठरू शकतो.