या मुस्लीम देशात कमाई, भारतात व्हाल लखपती; कोणता आहे हा देश तरी?
Jordanian Dinar Vs Indian Currency: जॉर्डन हा देश तसा छोटाच आहे. पण त्याचे चलन अगदी मजबूत आहे. 1 जॉर्डेनियन दिनार भारतीय रुपयांच्या तुलनेत किती मजबूत आहे हे तुम्हाला लागलीच लक्षात येईल.

Dinar Vs Rupees: जगात अनेक देश आहे. त्यांचे अनेक चलन आहेत. काही चलन हे भारतीय रुपयांपेक्षा पण मजबूत आहेत. या यादीत कुवेत, बहरीन, सौदी अरेबियापासून ते जॉर्डनपर्यंतची अनेक छोटे छोटे देश सामील आहेत. जगाच्या नकाशात ठिपक्या इतक्या या देशांचे चलन एकमद मजबूत आहे. जॉर्डन या देशात केवळ 1 कोटी 12 लाख लोक राहतात. पण या देशाचे चलन भारतीय रुपयांपेक्षा मजबूत आहे. वाईट डॉटकॉम नुसार, 1 जॉर्डेनियन दिनारची (JOD) किंमत भारतीय चलनात जवळपास 126.8 रुपयांच्या बरोबर आहे. 1 भारतीय रुपया जॉर्डनमध्ये केवळ 0.00788 जॉर्डेनियन दिनार इतका आहे. जर एखादा भारतीय जॉर्डनमध्ये केवळ 800 जॉर्डेनियन दिनार कमाई करत असेल तर भारतात त्याचे मूल्य 1 लाख 14 हजार रुपये इतके होते.
मूल्याच्या हिशोबाने जॉर्डेनियन दिनार खूप मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये जॉर्डनचा दिनार हा चौथ्या क्रमांकावर आहे. ही जगातील चौथ्या क्रमाकांची सर्वात उच्च मूल्य चलन मानल्या जाते. या यादीत केवळ कुवेतचा दिनार, बहिरीन दिनार आणि ओमानी रियाल हेच येतात. JOD हे जगातील सर्वात स्थिर आणि विश्वसनीय चलन मानल्या जाते.
जॉर्डिनिनयन दिनार इतका महागडा का?
Jordan देश इंधनाने समृद्ध नाही. तरीही त्याचे चलन जगात मजबूत आहे. त्यामागे आर्थिक धोरण, आर्थिकी नीती आणि आर्थिक निर्णय हेच मानल्या जाते. जॉर्डनचे चलन हे अमेरिकन डॉलरशी जोडलेले असल्याने ते स्थिर आहे. यामुळे बाजारात अचानक चढउताराचा कोणताही परिणाम त्यावर होत नाही. स्थिरतेमुळे या चलनावरील विश्वास अधिक आहे. तर जागतिक गुंतवणूकदारांची जोखीम सुद्धा कमी होते. जॉर्डनची केंद्रीय बँक नियंत्रीत पतधोरण नीती राबवते. मर्यादीत चलन पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या चलनाची बाजारात घसरण होत नाही. आर्थिक शिस्त हे या देशाचे सर्वात मोठे गमक मानण्यात येते.
भारतीय रुपया कमकुवत का?
जॉर्डनच्या दिनारपेक्षा भारतीय रुपया अत्यंत कमकुवत आहे. कारण भारतीय रुपया फ्री फ्लोटिंग चलन आहे. जागतिक व्यापार, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थिरता सारख्या अनेक गोष्टींचा भारतीय चलनावर मोठा परिणाम होतो. यामुळे रुपयात चढउतार झपाट्याने होतो. त्यामुळे भारतीय रुपयात पडझड दिसते.
