मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ

| Updated on: Oct 21, 2021 | 5:36 PM

मोदी सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्के केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई आराम (डीआर) मध्ये 11 टक्के वाढ मंजूर केली होती.

मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ
Follow us on

नवी दिल्ली: मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी ठरणार आहे. केंद्रीय नोकरदार आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ प्रस्तावित होती.  केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरुन वाढून 31 टक्के इतका झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर थोड्याचवेळात दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन याबद्दलची अधिकृत माहिती देतील.

1 जुलैपासून महागाई भत्त्याची रक्कम वाढली

मोदी सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्के केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई आराम (डीआर) मध्ये 11 टक्के वाढ मंजूर केली होती. ज्यामुळे 48 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला. आता डीएचा नवीन दर 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर गेला होता.

गेल्यावर्षी कोरोनामुळे एप्रिल महिन्यात अर्थ मंत्रालयाने महागाई भत्त्यात वाढ (डीए) 30 जून 2021 पर्यंत रोखून धरली होती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए दर 17 टक्के होता.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता

केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमांनुसार, HRA वाढविण्यात आलाय, कारण DA 25%पेक्षा जास्त आहे. या कारणास्तव केंद्र सरकारने HRA वाढवून 27% करण्याचा निर्णय घेतला.

हा आदेश जारी करताना सरकारने म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) आणि DA मध्ये त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे वाढ केली जाईल. सध्याचा नियम म्हणतो की, डीएची रक्कम बेसिक सॅलरीच्या 25 टक्क्यांहून अधिक झाल्यास HRA 3% ने वाढतो. 2017 मध्ये हा नियम करण्यात आला. कर्मचाऱ्याचा डीए त्याच्या बेसिक सॅलरीच्या 25% पेक्षा जास्त असेल त्याच्या HRA मध्ये बदल केला जाईल. त्यानुसार अलीकडेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा एचआरए जाहीर केला होता.

एचआरए आणि वेतन एकत्र देऊन सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुहेरी बोनसचा लाभ देईल किंवा दोन्हीचे पैसे वेगवेगळे मिळतील, याबाबत कोणताही शासकीय निर्णय समोर आलेला नाही. परंतु सणासुदीचा काळ लक्षात घेता सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना या ‘डबल बोनस’चा लाभ देऊ शकते. एचआरएचे पैसे वाढीव दराने मिळाल्याने पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या:

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ऑक्टोबर महिन्यात मिळणार 2,18,200 रुपयांची भेट

दिवाळीपूर्वी मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

सरकार एनपीएसमध्ये करणार हा मोठा बदल, कंपनी कायद्यात येऊ शकते पेन्शनचे काम

7th pay commission central government employee diwali 2021 gift as da hike 3 percent in bonus