AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलत; आता राज्य सरकारांनी कमी करावा ‘व्हॅट’.. पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग 11व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे की केंद्राने उत्पादन शुल्कात आधीच कपात केली आहे. आता राज्यांनी ‘व्हॅट’ मध्ये कपात करावी.

पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलत; आता राज्य सरकारांनी कमी करावा ‘व्हॅट’.. पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट
पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलतImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 16, 2022 | 7:54 PM
Share

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Rate) गगनाला भिडले आहेत. गेल्या 11 दिवसांपासून त्याची किंमत बदललेली नाही, परंतु त्याने आधीच 105 रुपयांची सरासरी पातळी ओलांडली आहे. पेट्रोल आणि डिझेल महागल्याने महागाईही वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून ‘व्हॅट’ ‘कर’ कपातीत सवलत (Discount) देण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकार कर वाढीच्या बाबतीत काहीही करणार नसल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने यापूर्वी पेट्रोलवर 5 रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांनी कपात केली होती. आता राज्य सरकारांची पाळी आहे. त्यांनी व्हॅट कमी केला पाहिजे.

इतर राज्याचे उदाहरण देताना पुरी म्हणाले की, छत्तीसगडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 24 टक्के व्हॅट आहे. हे 10 टक्क्यांपर्यंत खाली आणल्यास किमतीत अचानक मोठी घसरण होईल. व्हॅट कमी करून राज्य सरकारांच्या महसुलाचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, आर्थिक घडामोडींना वेग आला असून त्यामुळे मागणी वाढली आहे. अशा स्थितीत व्हॅट कमी केल्यास सरकारचा तात्काळ महसूल बुडणार नाही. भाजप शासित राज्यांमध्ये व्हॅटचे दर कमी आहेत, पण इतर राज्यांमध्ये व्हॅट खूप जास्त आहे.

पेट्रोलवरील ‘कर’ कीती ?

पेट्रोल आणि डिझेलवरील कराबद्दल बोलायचे झाल्यास, इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 16 एप्रिल रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. यामध्ये मूळ किंमत 56.32 रुपये, भाडे 0.20 रुपये आहे. अशा प्रकारे डीलरचा दर 56.52 रुपये होतो. केंद्र सरकार 27.90 रुपये उत्पादन शुल्क. डीलरचे कमिशन 3.86 रुपये आहे. व्हॅट रु.17.13 आहे. अशा प्रकारे एकूण किंमत रु. 105.41 वर पोहोचते.

डिझेलवर किती कर आहे?

दिल्लीत 16 एप्रिल रोजी डिझेलची किंमत 96.67 रुपये आहे. मूळ किंमत 57.94 रुपये आणि भाडे 22 पैसे आहे. अशा प्रकारे डीलरसाठी त्याचा दर 58.16 रुपये होतो. उत्पादन शुल्क 21.80 रुपये, व्हॅट 14.12 रुपये आहे. अशा प्रकारे एकूण किंमत 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती, दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 3 नोव्हेंबर 2021 रोजी सरकारने देशातील 130 कोटी जनतेला एक अद्भुत भेट दिली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी राज्य सरकारांना व्हॅटमध्ये कपात करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

इतर बातम्या

मालमत्ता खरेदीमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी; Bank of Baroda कडून संपत्तीचा लीलाव, खरेदीसाठी कर्जही मिळणार

तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...