AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CNG – PNG Price : सीएनजी, पीएनजी आणखी महाग होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

CNG, PNG  च्या किंमतींनी 12 एप्रिल रोजी उसळी घेतल्याने ग्राहकांचे तीन-तेरा वाजले. आता पुन्हा या दरात पाच रुपयांच्या भाव वाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणा-या ग्राहकांना भाव वाढीचा धक्का बसू शकतो.

CNG - PNG Price : सीएनजी, पीएनजी आणखी महाग होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Apr 16, 2022 | 11:32 AM
Share

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी (Petrol-Diesel Price) अगोदरच कहर केलेला असतानाच त्यात सीएनजी आणि पीएनजीने ही भाववाढीच्या आगीत उडी घेतली आहे. त्यामुळे मेट्रो शहरातील सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडून गेले आहे. सर्वच क्षेत्रातील ही भाव वाढ सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे. 22 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान पेट्रोल-डिझेल दरवाढीने मनमानी कारभार केला. तर सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या किंमतींनी ही पेट्रोल-डिझेलच्या पाऊलावर पाऊल टाकत आगेकूच केली . देशभरात सीएनजीच्या किंमतींचा भडका उडाला. त्यानंतर 12 एप्रिल रोजी पुन्हा भाव वाढीच्या चेंडूने नागरिकांच्या बजेटचा त्रिफळा उडविला. आता सीएनजी-पीएनजीच्या किंमती पुन्हा 5 रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने इनपुट नॅचरल गॅसच्या किंमतीत (Input Natural Gas Price) प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे किरकोळ विक्रीतही दर वाढ दिसून येत आहे.

महानगर गॅस लिमिटेडने कम्प्रेसड नॅचरल गॅसच्या दरात एका फटक्यात 7 रुपयांची वाढ केली होती. मुंबईत 7 एप्रिल रोजी एका किलो सीएनजीचे दर 67 रुपये होते. 12 एप्रिल रोजी सीएनजीच्या किंमतीत पुन्हा मोठी भाववाढ झाली. सीएनजीच्या किंमती 72 रुपये प्रति किलो झाल्या. पाच रुपयांच्या या भाववाढीने मुंबईकर चाकरमान्यांच्या जीवाला घोर लावला. आता त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षात 23 रुपयांची वाढ

ऑक्टोबर 2020 मध्ये एक किलो सीएनजीची किंमत 48.95 रुपये होती. जुलै 2021 मध्ये या किंमतीत एक-दीड रुपयांची वाढ झाली आणि किंमती 49.40 रुपयांवर पोहोचल्या. त्यानंतर किंमतींत सलग वाढ झाली आहे. वाढीनंतर 67 रुपयांवर असलेल्या सीएनजीच्या किंमती 12 एप्रिल रोजी थेट 72 रुपयांवर पोहचल्या. म्हणजे गेल्या दोन वर्षात किंमतीत 23 रुपयांची भरभक्कम वाढ झाली आहे. 1 एप्रिलपासून राज्य सरकारने सीएनजीवर व्हॅट मध्ये 6 रुपयांची कपात केली होती. पण ही कपात चाकरमान्यांच्या पथ्यावर काही पडली नाही.

पीएनजी गॅसच्या किंमतीत वाढ होऊन तो 41 रुपये प्रति क्युबिक मीटर या दराने मिळत होता. पीएनजीच्या किंमती 3.50 ते 36 रुपयादरम्यान प्रति मानक क्युबिक मीटर ची कपात करण्यात आली होती. पण 1 एप्रिलपासून नॅचरल गॅसच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. त्यानंतर आता पीएनजी गॅस 45.50 रुपयांवर पोहचला आहे. नैसर्गिक गॅसच्या किंमतीत 6.1 डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिटची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर सरकारने या किंमतीत वाढ केली आहे.

ओला-उबेरने वाढवल्या किंमती

आता या भाववाढीमुळे ओला-उबेर या टॅक्सी सर्व्हिसने ही त्यांच्या किरकोळ दरात वाढ केली आहे. सीएनजीच्या किंमती वाढल्याने या दोन्ही प्रवास सुकर करणा-या कंपन्यांनी आणि टॅक्सी चालकांनी 12 ते 15 टक्के भाव वाढ केली आहे. 14 एप्रिल रोजी दरवाढीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिसा आणखी हलका होणार आहे.

संबंधित बातम्या

केंद्र सरकारचा मसुदा : गृहनिर्माण क्षेत्रात दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणे अनिवार्य

Best Multibagger Penny Stocks :1 लाखांचे थेट झाले 18 लाख, या पेनी स्टॉकने 18 महिन्यात दिला बंपर रिटर्न

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी लोन हवंय? चिंता सोडा, SBI कडून ग्राहकांसाठी खास ऑफर

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.