AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनच्या या चालीमुळे भारताला बसू शकता झटका, 32 अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात

सन २०२५ मध्ये भारतात ६४ अब्ज डॉलरचे स्मार्टफोन बनवण्यात आले. त्यातील २४.१ अब्ज डॉलरच्या फोनची निर्यात झाली आहे. स्मार्टफोन देशातील टॉप एक्सपोर्ट प्रॉडक्ट झाले आहे. परंतु चीनचे निर्बंध या प्रगतीसाठी अडथळा ठरणार आहे.

चीनच्या या चालीमुळे भारताला बसू शकता झटका, 32 अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 18, 2025 | 11:55 AM
Share

चीनच्या अनौपचारिक व्यापार निर्बंधांमुळे भारताच्या स्मार्टफोन निर्यातीला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने सरकारला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, चीन औपचारिक सूचना न देता जाणूनबुजून निर्बंध लादत आहे. चीनकडून हे निर्बंध कॅपिटल इक्विपमेंट, मिनरल्स आणि टेक्निकल पर्सनलवर आणले आहेत. त्यामुळे शिपमेंटमध्ये विलंब होत आहे आणि खर्च वाढत आहे. यामुळे भारताला सुमारे 32 अब्ज रुपयांचे नुकसान होऊ शकते. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला धोका निर्माण होऊ शकतो.

पुरवठा साखळी विस्कळीत करण्याचा प्रयत्न

आयसीईएने म्हटले आहे की, भारताची पुरवठा साखळी विस्कळीत करण्याची चीनची योजना आहे. भारताच्या ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याचा प्रयत्नांना धक्का लावण्याचा चीनकडून प्रयत्न केला जात आहे. चीनच्या निर्बंधामुळे उत्पादनाची किंमत वाढत आहे. तसेच वेळेवर डिलेव्हरी देण्यात अडचणी येत आहेत. सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी आयसीईएने केली आहे. सध्या त्यात अ‍ॅपल, गूगल, मोटोरोला, फॉक्सकॉन, व्हिवो, ओप्पो, लाव्हा, डिक्सन, फ्लेक्स आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्ससारख्या कंपन्यांना फटका बसत आहे.

अ‍ॅपलचे भारतात उत्पादन

भारत इलेक्ट्रॉनिक्स मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये जगातिक शक्ती म्हणून उद्यास येत आहे, त्यावेळी चीनकडून निर्बंध आणले जात आहेत. पाच वर्षांपूर्वी अ‍ॅपलचे सर्व फोन चीनमध्ये तयार होत होते. परंतु २०२० मध्ये सुरु झालेल्या प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह योजनेत अ‍ॅपलने फॉक्सकॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत मिळून भारतात उत्पादन सुरु केले. आता जागतिक आयफोन उत्पादनापैकी २० टक्के उत्पादन भारतात होत आहे. अ‍ॅपल, गूगल, मोटोरोला आता भारतातून अमेरिकेत स्मार्टफोन निर्यात करत आहेत. सॅमसंगची भारतात उत्पादन क्षमता चांगली आहे. परंतु त्यांचे मुख्य निर्यात केंद्र व्हिएतनाम आहे.

२४.१ अब्ज डॉलरच्या स्मार्टफोनची निर्यात

सन २०२५ मध्ये भारतात ६४ अब्ज डॉलरचे स्मार्टफोन बनवण्यात आले. त्यातील २४.१ अब्ज डॉलरच्या फोनची निर्यात झाली आहे. स्मार्टफोन देशातील टॉप एक्सपोर्ट प्रॉडक्ट झाले आहे. परंतु चीनचे निर्बंध या प्रगतीसाठी अडथळा ठरणार आहे, असे आयसीईएने म्हटले आहे.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?