AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिगारेटचा झुरका महागणार! गुटख्यासह पान मसाल्याच्या किमतीही वाढणार, नवा कायदा येणार

Tax on Tobacco Products : तंबाखू, पान मसाला आणि सिगारेटसह संबंधित वस्तूंचे दर आगामी काळात वाढणार आहेत. या साठी सरकारकडून हिवाळी अधिवेशनात दोन विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे.

सिगारेटचा झुरका महागणार! गुटख्यासह पान मसाल्याच्या किमतीही वाढणार, नवा कायदा येणार
cigarette priceImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 10:34 PM
Share

तंबाखू, पान मसाला आणि सिगारेटसह संबंधित वस्तूंचे दर आगामी काळात वाढणार आहेत. या वस्तूंवरील GST रद्द होणार आहे, मात्र या वस्तूवरील कर तसाच ठेवण्यासाठी केंद्र सरकार लोकसभेत जीएसटी भरपाई उपकर किंवा दुसरा कर लागू करण्यासाठी दोन विधेयके सादर करण्याची शक्यता आहे. यामुळे या वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कार केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 आणि आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 ही विधेयकी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून सादर केली जाण्याची शक्यता आहे.

याबाबत पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले की, केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 मध्ये सिगारेटसारख्या तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क लादले जाणार आहे. तसेच आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 पान मसाल्यावरील उपकराची जागा घेणार आहे. या विधेयकांचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य खर्च पूर्ण करण्यासाठी निधी उभारणे आहे हे आहे.

सध्या किती कर आहे?

तंबाखू आणि पान मसाला 28% जीएसटी कराच्या कक्षेत आहे, तसेच यावर भरपाई उपकरही वेगवेगळ्या दरांनी आकारला जातो. 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू करताना, जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे काही राज्यांना झालेल्या महसुली नुकसानाची भरपाई करण्यासाठी 30 जून 2022 पर्यंत पाच वर्षांसाठी भरपाई उपकर प्रणाली लागू करण्यात आली होती. नंतर हा उपकर 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे यावर दुहेरी कर आकारला जात आहे.

तंबाखू आणि पान मसाल्यावरील उपकर

जीएसटी परिषदेने 3 सप्टेंबर 2025 रोजी, कर्जाची परतफेड होईपर्यंत तंबाखू आणि पान मसाल्यासह संबंधित उत्पादनांवर भरपाई उपकर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने जीएसटी दर 5 टक्के आणि 18 टक्के अशा दोन गटात लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही वस्तूंवरील भरपाई उपकर संपला होता. मात्र काही वस्तूंवर 40% दर निश्चित करण्यात आला होता. आता केंद्रीय उत्पादन शुल्क दुरुस्ती विधेयक 2025 आणि आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 द्वारे तंबाखू, सिगारेट आणि पान मसाला सारख्या पदार्थांवर नवीन कर लादणार आहे. जो सध्याच्या करापेक्षा जास्त असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या उत्पादनांच्या किमती आणखी वाढू शकतात.

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....