Gautam Adani : हिंडेनबर्ग प्रकरणात ‘सेबी’ची क्लीन चीट, गौतम अदानी यांना मोठा दिलासा

आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांना हिंडेनबर्ग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सेबीन क्लीन चीट दिली आहे.

Gautam Adani : हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीची क्लीन चीट, गौतम अदानी यांना मोठा दिलासा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2025 | 5:54 PM

आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांना हिंडेनबर्ग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने या प्रकरणात आपली चौकशी पूर्ण केली आहे. या प्रकरणात अदानी समूहाला क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर सेबीकडून स्पष्ट करण्यात आलं की, अदानी समूह आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर जे गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते, ते सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीयेत.

नेमकं काय होतं प्रकरण?

हिंडनबर्ग रिसर्चने जानेवारी 2023 मध्ये गौतम अदानी आणि त्यांच्या ग्रुपवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. अदानी समूहाकडून शेअर्समध्ये फेरफार करण्यात आले, अकाउंटींगमधील अनियमितता लपवण्यात आली. शेल कंपन्यांचा वापर करून निधी हस्तांतरीत करण्यात आता, तसेच कृत्रिमरित्या शेअर्सच्या किमती वाढवण्यात आल्या, असे अनेक आरोप अदानी समूहावर हिंडनबर्ग सिसर्चने केले होते.

 

सेबीनं काय सांगितलं

दरम्यान आता या प्रकरणात गौतम अदानी आणि अदानी समूहाला सेबीनं क्लीन चीट दिली आहे. सेबीनं 18 सप्टेंबर 2025 ला जारी केलेल्या आपल्या अंतिम आदेशात. गौतम अदानी, त्यांचे भाऊ राजेश अदानी आणि अदानी समूहा अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना दोषमुक्त केलं आहे.

सेबीच्या या निर्णयामुळे अदानी ग्रुपला मोठा दिलासा मिळाला आहे, गेले दोन वर्ष हे प्रकरण भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चांगलंच चर्चेत राहीलं. आता सेबीच्या या निर्णयामुळे अदानी समूहाला पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी मदत मिळणार आहे, यामुळे पुन्हा एकदा या समूहाच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.