Corona Virus | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ, अर्थव्यवस्थेसाठी मोदी सरकारचे मोठे निर्णय

| Updated on: Mar 24, 2020 | 3:37 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी (24 मार्च) एका पत्रकार (Income tax Return Date extend) परिषदेत घेत याबाबतची माहिती दिली.

Corona Virus | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ, अर्थव्यवस्थेसाठी मोदी सरकारचे मोठे निर्णय
Offline facility for ITR Form
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Income tax Return Date extend) आहे. कोरोनामुळे देशावर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठे व्यापारी, व्यावसायिक, उद्योग यांना दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व व्यावसायिकांना 30 जून 2020 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी याबाबची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी (24 मार्च) एका पत्रकार (Income tax Return Date extend) परिषदेत घेत याबाबतची माहिती दिली. त्यानुसार केंद्र सरकारने टॅक्स संबंधित सर्व व्यवहारांसाठी 31 मार्च तारीख वाढवून 31 जून केली आहे. त्याशिवाय आधार-पॅन लिंक करण्यासाठीही 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच टीडीएसवरील व्याजदर 18 टक्क्यांवरुन 9 टक्के करण्यात आला आहे.

त्याशिवाय जीएसटी फायलिंग करण्याची तारीख 30 जून करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या व्यापारांना दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे ज्या कंपन्यांचे कामकाज कोरोनामुळे ठप्प झाले आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारकडून मदत केली जाईल.

अर्थमंत्र्यांच्या घोषणा 

1. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख वाढवली, 30 जूनपर्यंत फाईल करता येणार

2. उशीरा रिटर्न फाईल करणाऱ्यांसाठी व्याज हे 12 टक्क्यांवरुन 9 टक्के

3.मार्च, एप्रिल आणि मे पर्यंतचा जीएसटीचा भरणा 30 जूनपर्यंत करता येणार.

4. आधार-पॅन लिंकची शेवटची तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली

5. टीडीएसवरचा व्याज 18 टक्क्यांवरुन 9 टक्के केले जाणार

6. कॉर्पोरेट्सच्या संचालक मंडळाच्या बैठका 60 दिवसांसाठी पुढे ढकलता येतील.

7. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ज्या कंपन्यांना CSR फंड द्यायचा असेल तो त्यांना देता येईल. त्याचा कोरोनाविरुद्धच्या लढाईत वापर करता येईल.

8. ज्या कंपन्यांचा टर्नओवर 5 कोटी आहे, त्यांनी जीएसटी रिटर्न फाईल करताना कोणताही इंटरेस्ट चार्ज होणार (Income tax Return Date extend) नाही.