AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : कच्चे तेल 15 टक्क्यांनी स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या महागाईतून सूटका कधी?

Petrol Diesel Price : कच्चा तेलाच्या किंमती गेल्या वर्षभराच्या तुलनेत खूप घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत असली तरी वर्षभरात मात्र या किंमती 15 टक्क्यांनी घसरल्या आहेत. मग आता जनतेला याचा फायदा कधी मिळणार

Petrol Diesel Price : कच्चे तेल 15 टक्क्यांनी स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या महागाईतून सूटका कधी?
आजचा भाव काय
| Updated on: Feb 26, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil) घसरणीला आहेत. कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत असतो. भारत सध्या रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात भारत रशियाकडून केवळ 0.2 टक्के इतके क्रूड ऑईल (Russian Crude Oil) खरेदी करत होता. यंदा हा वाटा 28 टक्क्यांवर पोहचला आहे. जानेवारीत भारताने प्रत्येक दिवशी 1.27 दशलक्ष बॅरल तेलाची रशियाकडून आयात केली. रशिया स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत असली तरी वर्षभरात मात्र या किंमती 15 टक्क्यांनी घसरल्या आहेत. म्हणजे इतर देशांसाठी परिस्थिती विपरीत असली तरी भारतासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे जनतेला पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price)आटोक्यात येतील, भाव कमी होतील, अशी आशा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 24 तासात कच्चा तेलाच्या किंमती (Crude Oil Price) पुन्हा वाढल्या. ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव आज 83.34 डॉलर प्रति बॅरल झाले. तर डब्ल्यटीआई ऑईलमध्ये 1.23 टक्क्यांची वाढ होऊन ते 76.32 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. भारत रशियासह इतर देशांकडून कच्चा तेलाची खरेदी करत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.32 तर डिझेल 92.84 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत 107.15 तर डिझेल 93.66 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
  6. नागपूरमध्ये पेट्रोल 106.14 तर डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  7. नांदेडमध्ये पेट्रोल 108.71 तर डिझेल 95.15 रुपये प्रति लिटर
  8. जळगावमध्ये पेट्रोल 107.43 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
  9. नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  10. लातूरमध्ये पेट्रोल 107.36 तर डिझेल 93.85 रुपये प्रति लिटर
  11. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.06 आणि डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.95 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.67 रुपये तर डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर आहे

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?