Petrol Diesel Price Today : कच्चे तेल झाले स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या भावात मिळेल का दिलासा

Petrol Diesel Price Today : वाहनधारकांना या महागाईत दुधाचे आणि इंधनाचे दर कमी हवे आहेत. बाकी इतर सर्व आघाड्यांवर ग्राहकाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर अगोदरच गगनाला आहेत. त्यात केंद्र सरकार वर्षभरापासून भाव स्थिर असल्याची पाठ थोपटून घेत आहे.

Petrol Diesel Price Today : कच्चे तेल झाले स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या भावात मिळेल का दिलासा
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 8:33 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे (Crude Oil Price) एक कदम पीछे, असा कदमताल सुरु आहे. अर्थात भारतीय तेल कंपन्या त्याचा फायदा उठवत आहे. स्वस्त तेलाचे अगोदरच बुकिंग केल्याने भविष्यात दाम वाढले तरी त्याचा तोटा या कंपन्यांना होणार नाही. वाहनधारकांना या महागाईत दुधाचे आणि इंधनाचे दर कमी हवे आहेत. बाकी इतर सर्व आघाड्यांवर ग्राहकाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर अगोदरच गगनाला आहेत. त्यात केंद्र सरकार वर्षभरापासून भाव स्थिर असल्याची पाठ थोपटून घेत आहे. पण आता पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel Price) दर कपात केल्याशिवाय नागरीकांची नाराजी दूर होईल, असे चित्र दिसत नाही. अमेरिकेतील बँकिंग क्षेत्राला तडे गेले आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसत आहे.

या सर्व घडामोडीत, केंद्र सरकारला इंधनाच्या आघाडीवर धक्का बसला आहे. पूर्ण वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत जनतेत अंसतोष आहे. सरकार केवळ भाव स्थिर असल्याचे पाठ थोपटून घेत आहे. आता फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्चच्या पहिल्या 15 दिवसांतच पेट्रोल-डिझेलची मागणी घसरल्याचे दिसून आले. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात कृषी क्षेत्रात मागणी वाढल्याने इंधनाची विक्री वाढली होती. पण मार्च महिन्यात तापमान वाढल्याने इंधनाची विक्री घटल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज, 17 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) घसरुन 68.35 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 74.75 डॉलर प्रति बॅरल आहे. आज, या किंमतींच्या आधारे भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले.

हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.50 तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.04 पेट्रोल आणि डिझेल 93.53 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.50 आणि डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.63 आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.73 तर डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 94.69 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.12 रुपये आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.69 आणि डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.