Bitcoin Investment : बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ? पडझडीचा होणार फायदा

Bitcoin Crash Alert : क्रिप्टो बाजारात पडझडीची लाट आली आहे. बिटकॉईन ETF (एक्सचेंज ट्रेडेड फंड) मध्ये गेल्या 30 दिवसांमध्ये 50,000 बिटकॉईनची गुंतवणूक झाली आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ आहे का?

Bitcoin Investment : बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ? पडझडीचा होणार फायदा
बिटकॉईन घसरण पथ्यावर?
| Updated on: Nov 06, 2025 | 9:21 AM

Crypto market crash upate : वर्ष 2025 मध्ये बिटकॉईनच्या (Bitcoin) किंमतीत मोठी घसरण आली. जून महिन्यात पहिल्यांदाच बिटकॉईन 1 लाख डॉलरपेक्षा (83 लाखांपेक्षा कमी) पघसरले. ऑक्टोबरच्या सुरुवातीला उच्चांकाहून जवळपास 20% घसरण आली. ताज्या वृत्तानुसार या घसरणीमुळे संपूर्ण क्रिप्टो मार्केटचे एकूण मूल्य 1 ट्रिलियन डॉलरपेक्षा (जवळपास 83 लाख कोटी रुपये) अधिकने घसरले. या वर्षातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

1 ट्रिलियन डॉलर बुडाले ?

तज्ज्ञांच्या मते, ही घसरण बिटकॉईन कमकुवत झाल्याने आलेली नाही. तर उधारीवर ट्रेडिंग केल्याने आली आहे. यामुळे बाजारात चढउताराचे सत्र वाढले आहे. परिणामी बाजारात बिटकॉईनच नाही तर इतर क्रिप्टो चलनातही घसरण दिसत आहे. वृत्तानुसार, रोज जवळपास
3 लाख ट्रेडर्सचे खाते जबरदस्ती बंद करण्यात आले आहे. 10 ऑक्टोबर रोजी 20 अब्ज डॉलरचे लिक्विडेशन दिसले. त्यातून मोठी पडझड झाली. अनेक तज्ज्ञांच्या मते उधारी ही एक नशा आहे. एक साधी बातमी जरी धडकली तरी बाजारात भूकंप येतो. गुंतवणूकदार एक तर मोठी खरेदी करतात अथवा विक्रीचे सत्र सुरू करतात. बाजारात मोठा चढउतार होतो.

बिटकॉईनचा भाव $100,000 पेक्षा कमी?

डेटा फर्म Glassnode नुसार, बिटकॉईनने आधारभूत किंमत स्तर (support level) $109,000 तोडला आणि आता हे चलन $103,500 च्या जवळपास व्यापार करत आहे. पुढील आधारभूत किंमत स्तर $99,000 च्या जवळपास आहे. बाजारात घसरण झाली तर ही सपोर्ट प्राईज सुरक्षा कवच म्हणून काम करते. CryptoQuant च्या आकडेवारीनुसार, हवसे,नवसे आणि गवसे या गुंतवणूकदारांमुळे, शॉर्ट-टर्म ट्रेडर्समुळे बाजाराला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या वृत्तानुसार, केवळ आजच जवळपास 30,000 बिटकॉईनचे नुकसान दिसले. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहे. STH-SOPR नावाचा इंटिकेटर जवळपास 1 इतका आहे. नफेखोरीमुळे हा फटका बसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

MEXC रिसर्चचे मुख्य विश्लेषक शॉन यंग यांच्या मते, बड्या कंपन्या सतत बिटकॉईनची खरेदी करत आहे. अमेरिका-चीनमधील व्यापारी करार, शेअर बाजारातील सुधारणा यामुळे नोव्हेंबर महिन्यात क्रिप्टो बाजारात सुधारणा येण्याची दाट शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या बाजार हा महत्त्वपूर्ण अशा $111,000 से $113,000 स्तरादरम्यान आहे. जर बिटकॉईनने हा स्तर तोडला तर तेजी दिसू शकते.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही क्रिप्टो करन्सीत स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.