Mutual Fund : अवघ्या 2000 रुपयांच्या नियमीत बचतीत तुम्ही पण व्हा करोडपती
Mutual Fund SIP : प्रत्येकाला वाटते की, त्याच्याकडे खूप पैसा असावा. त्याला पुढे पैशांची चिंता, फिकीर नसावी. करोडपती होण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. पण योग्य आणि नियमीत गुंतवणूक तुम्हाला काही वर्षांत करोडपती नक्की करू शकते. म्युच्युअल फंड त्यासाठी योग्य निवड ठरू शकते.

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या मदतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आता एकदम सोप्पं झालं आहे. म्युच्युअल फंडात इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. अर्थात सर्वच म्युच्युअल फंड्सने मालामाल केले असा त्याचा अर्थ नाही. तर काही फंड्सने गुंतवणूकदारांना गोत्यातही आणले आहे. त्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सावध असणे आवश्यक आहे. डोळे झाकून कोणत्याही फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार नाही.
म्युच्युअल फंड निवड खरंच असते का महत्वाची?
SIP करताना म्युच्युअल फंड निवड खरंच महत्त्वाची असते का? तर हो, आपल्याला SIP करण्यापूर्वी म्युच्युअल फंडमधील अटी आणि शर्तींचे वाचन करणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर गेल्या काही वर्षांतील या फंडची कामगिरी, परताव्याचे गणित आणि भविष्यातील त्याची वाटचालीचा अंदाज बांधणे आवश्यक आहे. जर गुंतवणूकदार प्रति महा 500 रुपयांची गुंतवणूक करत असेल तर ही अत्यंत छोटी रक्कम ठरेल. यामुळे जो परतावा मिळेल. तो ही मोठा नसेल. त्याऐवजी दरमहा 2000 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य स्ट्रॅटर्जी वापरली आणि आर्थिक शिस्त लावली तर या दोन हजार रुपयातून मोठ्या फंडाची उभारणी करता येईल.
2000 रुपये मासिक SIP मधून कोट्यवधींचा फंड
तर 2000 रुपये मासिक SIP मधून 1.59 कोटींचा फंड तयार होऊ शकतो. त्यासाठी गुंतवणूकदाराला दरमहा 2000 रुपयांची SIP करावी लागेल. एकही SIP न चुकवता जर गुंतवणूकदार सलग 30 वर्षांपर्यंत एसआयपी सुरु ठेवेल आणि या काळात तो यातून एक छद्दामही रक्कम काढणार नाही तर कोट्याधीश होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी एक ट्रीक वापरणे फायदेशीर ठरेल. प्रत्येक वर्षी 10% टॉप-अप केले तर अपेक्षेपेक्षा मोठा फंड उभा राहिल.
टॉप-अप SIP म्हणजे काय?
टॉप-अप SIP मध्ये दरवर्षी मासिक SIP ची रक्कम 10% वाढवावी लागते. अशात जर तुम्ही 2000 रुपयांचा टॉप-अप SIP 30 वर्षांसाठी सुरु ठेवाल तर तुम्ही एकूण 39.47 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. 30 वर्षांनी तुम्हाला एकूण 1.59 कोटी रुपये मिळतील. यामध्ये केवळ 1.20 कोटी रुपयांचा परतावा असेल. चक्रवाढ व्याजाचा फायदा गुंतवणूकदाराला मिळेल. त्यामुळे बचतीवर व्याज आणि त्यावर पुन्हा व्याज हे चक्र अखंडीत सुरु राहिल.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
