Businessman : कधी 218 रुपये महिन्याने केली नोकरी, नंतर कष्टाने उभारली कोट्यवधींची कंपनी, एका अभियंत्याचा प्रेरणादायी प्रवास..

Businessman : जेपी समूहाची सिमेंट कंपनीची विक्री होत आहे, त्याचे संस्थापक जे पी गौर यांचा प्रेरणादायी प्रवास..

Businessman : कधी 218 रुपये महिन्याने केली नोकरी, नंतर कष्टाने उभारली कोट्यवधींची कंपनी, एका अभियंत्याचा प्रेरणादायी प्रवास..
प्रेरणादायी प्रवासImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 6:51 PM

नवी दिल्ली : कर्जात गटांगळ्या खाणाऱ्या जेपी समूहाची (Jaypee Group) सिमेंट कंपनी विक्री होणार आहे. दालमिया सिमेंटने जेपी सिमेंट व्यवसाय 5666 कोटी रुपयांनी खरेदी केली. दालमिया भारत लिमिटेड (Dalmia Bharat) मालकीची सिमेंट कंपनी दालमिया सिमेंट लिमिटेडने (DCBL) जेपी सिमेंट (Jaypee Cement) खरेदी केली. यापूर्वी 2016 मध्ये अल्ट्राटेकने (Ultratech Cement) जेपी सिमेंट प्लॅंट खरेदी केला. जयप्रकाश समूहाची स्थापना 218 रुपये महिना कमाई करणाऱ्या एका अभियंत्यांने केली आहे.

1931 मध्ये जयप्रकाश गौर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झाला होता. मध्यम वर्गीय कुटुंबात गौर यांचा जन्म झाला. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची (Civil Engineering) पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरी केली. त्यावेळी त्यांना 218 रुपये महिना मिळाला.

बेतवा नदीवरील धरण बांधण्यावर ते काम करत होते. त्यांना 218 रुपये महिना मिळाला. ही नोकरी करण्याऐवजी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. 1958 मध्ये जे पी गौर यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर त्यांची प्रगती झाली.

हे सुद्धा वाचा

देशातील पहिल्या अॅक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे ते फॉर्मुला वन रेसिंग ट्रॅक तयार करण्याचे काम त्यांच्या कंपनीने केले. 165 किमी लांबीचा ग्रेटर नोएडा-आग्रा एक्सप्रेसवे तसेच यमुना एक्सप्रेस वेची निर्मिती जेपी यांनीच केली आहे. त्यानंतर त्यांनी बांधकाम व्यवसायातही नशीब आजमावले. दिल्ली एनसीआर परिसरात त्यांच्या 32,000 हून अधिक सदनिका आहेत.

केवळ 100 रुपये खिशात घेऊन त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरु झाल्याचे जेपी गौर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. त्यांना 1979 मध्ये इराकमधील 250 कोटी रुपयांचे काम मिळाले होते. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी पहिले हॉटेलही सुरु केले. त्याचे नाव सिद्धार्थ ठेवले होते.

1986 मध्ये त्यांनी जे पी सिमेंटची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक क्षेत्रात जेपी समूहाने प्रवेश केला. त्यात नाव काढले. 2014 मध्ये या समूहाने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात प्रवेश केला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.