December Bank Holiday : डिसेंबर महिन्यात तब्बल 19 दिवस बँका बंद, पाहून घ्या लिस्ट नाहीतर होईल अडचण!
आता डिसेंबर महिना चालू झाला आहे. या महिन्यात बँकांना बऱ्याच सुट्ट्या असणार आहेत. संपूर्ण देशात वेगवेगल्या सणांमुळे बँका 19 दिवस बंद राहणार आहेत.

Bank Holidays In December 2025 : आता नोव्हेंबर महिना संपला असून 2025 सालाच्या शेवटच्या महिन्याला म्हणजेच डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. नव्या महिन्याला सुरुवात झाल्यानंतर आता अनकेजण या महिन्यात कोण-कोणती कामे करायची याचे नियोजन लावत असतील. अनेकांचे बँकांचे व्यवहारदेखील डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन असेल. परंतु दीर्घकाळ रखडलेले बँकेचे काम डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्याचा तुमचा विचार असेल तर त्याआधी डिसेंबर महिन्यात नेमक्या किती आणि कोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. हे जर माहिती नसेल तर तुमची ऐनवेळी फजिती होऊ शकते.
19 दिवस बँका राहणार बंद
डिसेंबर महिन्यात वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सण-उत्सव लक्षात घेऊन बँका रवीवार, दुसऱ्या शनिवारच्या सुट्ट्या मिळून एकूण 19 दिवस बंद राहणार आहेत. 2025 सालातील डिसेंबर महिन्यात एकूण चार रवीवार आणि दोन शनिवार आहेत. या दिवशीदेखील बँका बंद असतील. वेगवेगळ्या राज्यांत स्थानिक सण-उत्सवांमुळे बँकांना एकूण 13 सुट्ट्या असणार आहेत.
दुसरा आणि चौथा शनिवार कधी?
डिसेंबर 2025 या महिन्यात 7, 14, 21 आणि 28 तारखेला रविवार आहे. त्यामुळे या चार दिवसांत संपूर्ण देशात बँका बंद असतील. तसेच 13 डिसेंबर रोजी महिन्याचा दुसरा आणि 27 डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असणार आहे. या दिवशीदेखील देशभरातील बँका बंद असतील. यासोबतच देशातील वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक सण, उत्सवांमुळे डिसेंबर महिन्याच्या 1, 3, 12, 18, 19, 20, 22, 24, 25, 26, 27, 30 आणि 31 या तारखांना वेगवेगळ्या राज्यांत स्थानिक सणांमुळे बँका बंद असतील.
तुमच्या राज्यात बँका कधी बंद असतील?
1 डिसेंबर- अरुणाचल प्रदेश, नागालँडमध्ये राज्य उद्घाटन दिवस आणि स्वदेशी आस्था दिवसानिमित्त बँका बंद असतील
3 डिसेंबर- गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर पर्व साजरे केले जाईल. त्यामुळे या तारखेला गोव्यातील सर्व बँका बंद असतील.
12 डिसेंबर- पा तोगन नेंगमिन्जा संगमा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेघालयात सर्व बँका बंद असतील.
18 डिसेंबर- यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेघालयातील सर्व बँका बंद असतील.
19 डिसेंबर- गोवा लिबरेशन डेच्या निमित्ताने गोव्यातील सर्व बँका बंद असतील.
20 डिसेंबर- सिक्किममध्ये लोसुंग, नासुंग या सणानिमित्त सर्व बँका बंद असतील.
22 डिसेंबर- सिक्किममध्ये लोसुंग, नासुंग या सणानिमित्त सर्व बँका बंद असतील.
24 डिसेंबर- ख्रिसमसच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने मिझोरम, नागालँड, मेघालयमध्ये सर्व बँकांना सुट्टी असेल.
25 डिसेंबर – ख्रिसमसच्या निमित्ताने संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.
26 डिसेंबर- मिझारोम, नागालँड, मेघालयमध्ये ख्रिसमसमुळे बँका बंद असतील.
27 डिसेंबर- नागालँडमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँका बंद असतील.
30 डिसेंबर- मेघालयमध्ये यू किआंग नांगबाह यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व बँका बंद असतील.
31 डिसेंबर- मिझोरम, मणिपूर येथे नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येनिमित्त बँका बंद असतील.
