
Diwali Insurance Plans : दिवाळीची सर्वत्र धूम सुरू आहे. या काळात मिठाई, नवीन कपडे, नवीन खरेदीसोबतच फटाके फोडण्याचा आनंद लुटल्या जातो. अबालवृद्ध फटाके फोडतात. पण अनेकदा फटाके फोडताना एखादी अप्रिय घटना घडते. अशावेळी मोठी इजा झाल्यास मोठा खर्च लागू शकतो. मग त्यावेळी विम्याची गरज भासते. ऑनलाइन पेमेंट ॲप फोनपे (PhonePe) कंपनीने स्पेशल इन्शुरन्स आणला आहे. त्यासोबत CoverSure कंपनीने स्वस्तात विमा आणला आहे.
11 रुपयांमध्ये 25 हजारांचे विमा संरक्षण
फोनपे या कंपनीने फायरक्रॅकर्स इन्शुरन्स (PhonePe’s Firecracker Insurance) आणला आहे. हा विमा अवघ्या 11 रुपयांत ऑनलाईन खरेदी करता येतो. फटक्यामुळे अपघात झाल्यास 25 हजार रुपयांचा विमा संरक्षण मिळते. गेल्यावर्षी हा विमा 9 रुपयांत देण्यात येत होता. आता त्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा विमा आता 11 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा विमा फेस्टिव्ह सीजनपर्यंत सुरू असेल. त्यानंतर खरेदी करण्यात आलेला विमा 11 दिवसांसाठी सुरु असेल. याचा अर्थ 11 रुपयांच्या या खास विमा प्लानमध्ये विमाधारकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जवळपास 11 दिवसांसाठी 25 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
CoverSure ची फायरक्रॅकर विमा पॉलिसी
फिनटेक कंपनी CoverSure ने एक नवीन फायरक्रॅकर विमा पॉलिसीची घोषणा केली. कंपनी अवघ्या 5 रुपयांच्या प्रीमियमवर 50 हजार रुपयांचा विमा देणार आहे. CoverSure च्या विमा पॉलिसीत मृत्यू ओढावल्यास 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. तर फटाक्यामुळे जखमी झाल्यास 10 हजारांपर्यंतचा विमा लाभ मिळतो. ही विमा पॉलिसी या 10 दिवसांसाठी लागू असेल. तुम्ही कंपनीच्या साईटवर ही पॉलिसी खरेदी करू शकता.
या पॉलिसीविषयी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सौरभ विजयवर्गीय यांनी माहिती दिली. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे इजा होण्याची भीती असते. त्यासाठी कंपनीने अवघ्या 5 रुपयांत विमा पॉलिसी आणल्याचे ते म्हणाले. ही पॉलिसी या दिवसात फायदेशीर असल्याचे ते म्हणाले. या दोन्ही पॉलिसीसाठी अटी आणि शर्ती आहेत. त्या वाचून ही पॉलिसी खरेदी करता येईल. या पॉलिसीमुळे दिवाळीत काही इजा, अपघात झाल्यास उपचार खर्च मिळेल.
या पॉलिसीत फटक्यामुळे इजा झाल्यास उपचारासाठी मदत मिळेल.
अशा अपघातात 24 तासांपेक्षा अधिक काळ उपचारासाठी भरती व्हावे लागले तर त्याचा खर्च कंपनी करेल.
डे-केयर ट्रीटमेंट म्हणजे 24 तासांपर्यंतच्या उपचाराचा खर्च करण्यात येईल.
जर फटाका अपघातात मृत्यू झाला तर वारसदाराला विमातंर्गत भरपाई देण्यात येईल.