AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बँकेला सुट्टी? शाळा पण राहणार का बंद?

Bank Holiday : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बँका यांना सुट्टी जाहीर केली आहे. देशात केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालय, बँकांना सुट्टी आहे का?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बँकेला सुट्टी? शाळा पण राहणार का बंद?
बँका, शाळा, कार्यालयांना सुट्टी?
| Updated on: Dec 27, 2024 | 11:19 AM
Share

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांनी 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधानांच्या निधनानंतर संपूर्ण देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बँका यांना आज सुट्टी जाहीर केली आहे. देशात केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालय, बँकांना सुट्टी आहे का?

कर्नाटक राज्यात दुखवटा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर कर्नाटक सरकारने आज सर्व शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. कर्नाटक सरकारने आज सुट्टी जाहीर केल्याने आणि त्याचे वृत्त सर्वत्र पसरले. त्यामुळे इतर राज्यात सुद्धा शाळा, बँकांना सुट्टी असल्याचा दावा करण्यात येत आहे, त्यात किती तथ्य आहे?

कोणत्या राज्यात सुट्टी?

वृत्तानुसार, कर्नाटक राज्याने आज सुट्टी जाहीर केली. तशीच सुट्टी तेलंगाणा राज्यात जाहीर करण्यात आली आहे. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वातील सरकारने शुक्रवारी सरकारी कार्यालय आणि शाळांना सुट्टी दिली आहे. कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यातील सरकारी कार्यालये आणि बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. सूत्रांच्या माहिती आधारे इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले.

दिल्लीतील AIIMS मध्ये निधन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. त्यांना काल रात्री आठ वाजून 6 मिनिटाला एम्सच्या अतिदक्षता रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. रात्री 9:51 वाजता त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.  26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. पंजाब प्रांतात असलेल्या गाह हे त्यांचे मूळ गाव होते. हे गाव आता चकवाल जिल्ह्यात येते. 2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यावेळी पाकिस्तानमध्ये त्याची सर्वाधिक चर्चा झाली होती.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!