AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC आणि यूनायटेड बँक ऑफ ईंडियाच्या ग्राहकांचे ऑनलाईन व्यवहार बंद होणार?, वाचा बँकेचे स्पष्टीकरण

बँकांचे विलगीकरण झाल्यानंतर रोज नवनव्या अफवा पसरवल्या जात आहे. बँकेच्या व्यवहारासंदर्भात आता आणखी एक अफवा पसरत आहे. (obc bank uni bank punjab national bank)

OBC आणि यूनायटेड बँक ऑफ ईंडियाच्या ग्राहकांचे ऑनलाईन व्यवहार बंद होणार?, वाचा बँकेचे स्पष्टीकरण
सांकेतिक फोटो
| Updated on: Mar 28, 2021 | 12:04 AM
Share

मुंबई : केंद्र सरकारने बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील अनेक खातेधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकांच्या विलीनीकरणामुळे रोज नवनव्या अफवा पसरवल्या जात आहे. बँकेच्या व्यवहारासंदर्भात आता आणखी एक अफवा पसरत आहे. ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC-Oriental Bank of Commerce) आणि यूनायटेड बँक ऑफ ईंडिया (UNI-United Bank of India) यांचे खातेधारक 1 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करु शकणार नाहीत, असे सांगितले जातेय. मात्र, पंजाब नॅशनल बँकेने (PNB-Punjab National Bank) याविषयी सविस्तर माहिती दिली असून असे काहीही होणार नसल्याचे या बँकेने स्पष्ट केले आहे. (e OBC e UNI customers will be provided with new IFSC / MICR codes said Punjab National Bank)

अफवा खोटी असल्याचा पीएनबी बँकेचा खुलासा

या अफवेनंतर सविस्तर माहिती देण्यासाठी पीएबी बँकेने एक ट्विट केले आहे. यामध्ये OBC आणि UNI बँकेच्या खातेधारकांना कोणताही अडचण येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच, ओबीसी आणि यूएनआय या दोन्ही बँका पीएनबी बँकेत विलीन झाल्यानंतर ऑनलाई व्यवहारासाठी तुमच्या बँकेचा फक्त नवा IFSC कोड लागेल. त्यानंतर OBC आणि UNI बँकेच्या ग्राहकांना त्यांचे ऑनलाईन व्यवहार करता येतील, असे पीएनबीने सांगितले आहे.

जाणून घ्या यूनायटेड बँकेचा इतिहास

मिळालेल्या माहितीनुसार 19 जुलै 1969 रोजी यूनायटेड बँक ऑफ ईंडिया बँकेचे राष्ट्रीयकरण झालं होत. या बँकेची स्थापना 1950 मध्ये झाली होती. कोमिल्ला बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (1914), बंगाल सेंट्रल बँक लिमिटेड (1918), कोमिल्लान यूनियन बँक लिमिटेड (1922) आणि हुगली बँक लिमिटेड (1932) या चार बँकाचे विलीनीकरण होऊन यूनायटेड बँक ऑफ ईंडियाची स्थापना झाली होती.

ओरियंटल बँकेचा इतिहास

ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स ही बँक एक सरकारी बँक आहे. या बँकेची स्थापना 19 फेब्रुवारी 1943 लोहोरमध्ये झाली होती. यावेळी देशाचे विभाजन झालेले नव्हते. या बँकेचे संस्थापक आणि पहिले चेअरमन हे राय बहादूर लाला सोहन लाल हे होते. 1947 मध्ये भरताचे विभाजन झाल्यानंतर या बँकेला पाकिस्तानमधील आपल्या सर्व शाखा बंद कराव्या लागल्या. यावेळी या बँकेचे मुख्यालय लाहोरवरुन पंजाबमधील अमृतसरमध्ये हालवण्यात आले. यावळी बँकेचे तत्कालीन चेअरमन लाला करम चंद थापर यांनी पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या सर्व नागरिकांचे पैसे परत केले होते. या बँकचे 15 एप्रिल 1980 रोजी राष्ट्रीयकरण झाले होते.

इतर बातम्या :

Gold Prices Today: सोनं खरेदी करायचं असेल तर लगेच करा; होळीनंतर दर चार हजारांनी वधारणार?

LIC IPO तून सरकारला 1 लाख कोटी आणि BPCL कडून 80 हजार कोटींची कमाई: CEA सुब्रमण्यम

महागाईत आता विजेचा शॉक! 1 एप्रिलपासून कूलर-एसीची हवा महागणार, पैशाची बचत?

(e OBC e UNI customers will be provided with new IFSC / MICR codes said Punjab National Bank)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.