
Employee Enrollment Scheme 2025: केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओच्या 73 व्या स्थापना दिनी ( 1 नोव्हेंबर 2025 ) एम्प्लॉयी इनरॉलमेंट स्कीम 2025 ( Employee Enrollment Scheme 2025 ) ची सुरुवात केली आहे. या योजनेचा उद्देश्य काही कारणांनी पीएफ सिस्टीमच्या बाहेर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा पीएफ योजनेत सहभागी करणे आणि सोशल सिक्युरिटी देणे आहे.
एम्प्लॉयी इनरॉलमेंट स्कीम 2025 कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने ईपीएफओत सामील करण्यासाठी सुरु करण्यात आली होती. आणि या स्कीम उद्देश्य देशातील जास्तीत जास्त कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या घेऱ्यात आणणे हा होता.
या नव्या योजनेंतर्गत एम्प्लॉयर त्या कर्मचाऱ्यांनाही देखील ईपीएफओमध्ये रजिस्टर्ड करु शकतात जे 1 जुलै 2017 ते 31 ऑक्टोबर 2025 च्या दरम्यान कोणा कंपनीशी जोडले गेले परंतू काही कारणांनी EPF स्कीममध्ये सामील केले गेले नाहीत. ही स्कीम 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेली नाही.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार या योजनेत एम्प्लॉयरला ( कंपनी) जर त्यांनी पगारातून आधी पैसे कापले नसतील तर कर्मचाऱ्यांच्या हिश्शांचा मागचे पीएफ योगदान जमा करावा लागणार नाही. तसेच केवळ 100 रुपयांचा नाममात्र दंड भरावा लागेल. एम्प्लॉयरला केवळ त्यांच्या वाटचे योगदान जमा करावे लागणार आहे.
ही योजना त्या सर्व संस्थांना लागू होईल, ज्या वर्तमानात तपासणीच्या घेऱ्यात आहेत, केवळ कर्मचारी हयात असावेत आणि कार्यरत असावेत. परंतू ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच कंपनी सोडली आहे, त्यांच्या बाबतीत EPFO स्वत: कोणतीही करणार नाही.
सरकारच्या या पावलाने देशातील लाखो कामगार भविष्य निधीच्या सुरक्षेशी जोडले जाऊ शकणार आहेत. या सोबत सरकार भविष्यात EPF ची वेतन मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्याच्याही तयारीत आहे. ज्यामुळे आणखीन कामगारांना याचा फायदा मिळणार आहे.