Smriti Mandhana-Palash Muchhal : दोन्ही कुटुंबं.. स्मृती-पलाशचं लग्न टळल्यानंतर पहिल्यांदाच बोलली पलक मुच्छल
Palak Muchhal On Smriti-Palash Wedding : महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबरला होणारा विवाह पुढे ढकलण्यात आला. या घटनेला आता 10-12 दिवस उलटून गेले असून लग्नाबद्दल पुढे काहीच अपडेट्स आलेले नाहीत. वडिलांना बरं नसल्याने स्मृती सदोदित त्यांच्यासोबत आहे, तर काही दिवसांपूर्वीच पलाश हा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दिसला होता. या सर्व प्रकरणावर आता पलाश याची बहीण पलक मुच्छल पहिल्यांदाच बोलली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघातील शानदार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) … 23 नोव्हेंबरला दोघेही सांगलीत लग्न करणार होते. पण त्या आलंदिवशी सकाळीच हे लग्न पुढे ढकलण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण त्यानंतर अशा अफवा उठू लागल्या की पलाशने स्मृतीला चीट केली, तिची फसवणूक केली, लग्नाच्या आदल्या दिवशीच तो दुसऱ्या मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला होता, त्यामुळेच हे लग्न टळलं. या सर्व घटनांनंतर अनेक चर्चा, अटकळी सुरू झाल्या, काही तरूणीही पुढे आल्या, अनेकींची नाव पलाशसोबत जोडली गेली. मात्र या संपूर्ण प्रकरणावर किंवा लग्नाबाबत स्मृती अथवा पलशा यांनी मौन सोडलं नाही. हे सगळं होऊन आता 10 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला असून आता पलाश मुच्छल याची बहीण, पलक हिने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
फिल्मफेअरशी बोलताना पलक हिने पलाश आणि स्मृतीच्या टळलेल्या लग्नाबद्दल रिॲक्शन दिली. कठीण काळाचा सामाना करण्याबाबत आणि सकारात्मक राहण्याबद्दलही ती बोलली. पलक म्हणाली – ‘मला असं वाटतं की दोन्ही कुटुंबांनी खूप कठीण काळाचा सामना केला आहे. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की… मी पुन्हा सांगू इच्छिते की या काळात आपल्याला फक्त सकारात्मक रहायचं आहे, त्यावर विश्वास ठेवायचा आहे. जेवढं शक्य होईल तितकी सकारात्मकता पसरवायची आहे आणि मजबूत रहायचं आहे’ असं पलकने नमूद केलं.
याआधीही पलकने शेअर केली होती पोस्ट
यापूर्वी, पलक मुच्छल हिने पलाश आणि स्मृतीचे लग्न पुढे ढकलण्याचे कारण उघड केले होते. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये लोकांना दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले होते. “स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे, स्मृती आणि पलाशचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की या कठीण काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा.” असं तिने पोस्टमध्ये लिहीलं होतं.
पलाशच्या अफेअरच्या चर्चा व्हायरल
23 नोव्हेंबरला पलाश-स्मृतीचं लग्न होतं, पण सकाळीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली. हार्ट अटॅक आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर या जोडप्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. पण त्यानंतर अशा अनेक चर्चा, अफवा समोर आल्या की पलाशचं एका कोरिओग्राफरशी अफेअर होतं, त्यामुळेच हे लग्न टळलं. अजूनही अनेक गोष्टी घडल्याचा दावा करण्यात आला. मात्र आत्तापर्यंत पलाश किंवा स्मृती, कोणीच या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
तर काही दिवसांपूर्वी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना पलाशच्या आईने असा दावा केला होता की, ‘ पलाश हा स्मृतीच्या वडिलांच्या खूप निकट आहे, स्मृतीपेक्षा ते दोघे क्लोज आहे. जोपर्यंत स्मृतीच्या वडिलांची तब्येत ठीक होणार नाही, तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय पलाशने घेतला ‘ असं त्याच्या आईने म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर स्मृती किंवा पलाश दोघेही अधिकृतपणे कधी बोलतात, त्यांचं लग्न होणार का, ते कधी होणार याबद्दल चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
