AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : अगोदर केले करोडपती, आता आणले रोडवरती; या शेअरने गुंतवणुकदारांना फुटला घाम

या शेअरने अगोदर मोठी झेप घेतली होती. या शेअरने दमदार रिटर्न दिला. या स्टॉकने गुंतवणूकदारांना रात्रीतून करोडपती केले. तर आता या शेअरने त्यांची चिंता वाढवली आहे. आता या शेअरमध्ये मोठी पडझड दिसून येत आहे.

Share Market : अगोदर केले करोडपती, आता आणले रोडवरती; या शेअरने गुंतवणुकदारांना फुटला घाम
अगोदर करोडपती आता रोडवरतीImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 03, 2025 | 10:29 AM
Share

Elcid Investment Share : शेअर बाजारात काही स्टॉक अचानक रॉकेट प्रमाणे झेप घेतात आणि नंतर गुंतवणूकदारांना जमिनीवर आणतात. अशीच काही गोष्ट Elcid Investments Ltd ची आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 24 तासात करोडपती केले. हा शेअर गेल्या 8 महिन्यात 60 टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. या शेअरने अनेकांना कमी कालावधीत कोट्याधीश केले होते. तर आता या शेअरची किंमत अर्ध्यावर आली आहे. हा शेअर अजून घसरणा की काय ही चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे.

100 रुपयांहून थेट 2 लाखांवर

Elcid Investments चे नाव तेव्हा चर्चेत आले जेव्हा हा शेअर अचानक 100 रुपयांहून थेट 2 लाख रुपयांपर्यंत गेला. या शेअरने काही तासातच गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. पण आता हा शेअर 77,902 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे. या शेअरमध्ये घसरण अद्यापही सुरूच आहे.

का वाढला हा शेअर?

Elcid Investments ची खरी ताकद ही त्याच्या होल्डिंग व्हॅल्यूमध्ये दडलेली आहे. या कंपनीचा Asian Paints सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये वाटा आहे. 2023 मध्ये या कंपनीचा बुक व्हॅल्यू प्रति शेअर 6 लाख रुपयांहून अधिक होती. तर शेअरची मार्केट किंमत कमी होती. यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरवर उड्या मारल्या. या स्टॉक मागणीच्या लाटेवर स्वार झाला.

मग ही घसरण का?

या शेअरमध्ये मोठी तेजी आली असताना पण या शेअरमध्ये कमी खरेदी-विक्रीमुळे आणि इतर कारणांमुळे गुंतवणूकदारांनी नफा वसूली सुरू केली. प्रमोटर्सकडे या कंपनीचे 90 टक्क्यांहून अधिकचे शेअर आहेत. बाजारात या शेअरची उपलब्धता अत्यंत कमी आहे. या शेअरचा व्हॅल्यूम कमी आणि घसरण अधिक अशी परिस्थिती आहे.

Unlisted Category आणि Delisting ची चर्चा

Elcid Investments हे दीर्घकाळापासून एक विशेष प्रकरण म्हणून बाजारात ओळखल्या जाते. कारण हा शेअर बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर ट्रेड होतो. या शेअरच्या डीलिस्टींगची चर्चा सुरू आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांना पारदर्शकता आणि योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप करण्यात येतो.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.