असं काय झालं? हातात वॉश बेसिन घेऊन एलन मस्क थेट ट्विटरच्या ऑफिसात; म्हणाले, let that sink in!

| Updated on: Oct 27, 2022 | 10:10 AM

एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईल बायोमध्ये चीफ ट्विट असं लिहिलं आहे. यावरून तेच ट्विटरचे पुढील बॉस असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, मस्क यांनी ट्विटर खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.

असं काय झालं? हातात वॉश बेसिन घेऊन एलन मस्क थेट ट्विटरच्या ऑफिसात; म्हणाले, let that sink in!
हातात वॉश बेसिन घेऊन एलन मस्क थेट ट्विटरच्या ऑफिसात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: अब्जाधीश एलन मस्क (Elon musk) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. अत्यंत मजेदार असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत ते ट्विटरच्या कार्यालयात दिसत आहे. बरं एलन मस्क साध्या सरळ पद्धतीने ट्विटरच्या कार्यालयात आलेले नाहीत. तर त्यांनी ट्विटरच्या (twitter) कार्यालयात अफलातून एन्ट्री घेतली आहे. मस्क थेट हातात वॉश बेसिन घेऊनच ट्विटरच्या कार्यालयात आले आहेत. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर कमेंट आणि लाईकचा पाऊसच पाऊस पडत आहे.

हे सुद्धा वाचा

एलन मस्क यांनी फ्रान्सिस्को येथील ट्विटर इंकच्या कार्यालयात गेल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मस्क 44 बिलियन डॉलरची ट्विटर डील क्लोज करण्यात मग्न आहेत. त्यांनी 13 एप्रिल रोजी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर त्यांनी ही डील थांबवली होती. मात्र, आता ही डील पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

याच डीलसाठी ते ट्विटरच्या हेड क्वॉर्टरमध्ये गेले होते. त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांच्या हातात सिंक दिसत आहे. ते हाताने वॉश बेसिन उचलून ऑफिसमध्ये येत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी त्यावर कॅप्शनही दिलं आहे. ‘Entering Twitter HQ – let that sink in!. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

 

दरम्यान, एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईल बायोमध्ये चीफ ट्विट असं लिहिलं आहे. यावरून तेच ट्विटरचे पुढील बॉस असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, मस्क यांनी ट्विटर खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 13 बिलियन डॉलर बँकेतून ट्रान्स्फर करण्यास सुरुवात केली आहे.