AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Pension: तुम्ही 10 वर्षे नोकरी केली तर किती पेन्शन मिळणार? वाचा A टू Z माहिती

अनेक खासगी कंपन्यांमधील कर्मचारी 58-60 वर्षांनी निवृत्त होतात आणि ईपीएफ पेन्शनचा लाभ घेतात. 10 वर्षे काम केल्यावरही तुम्हाला ईपीएस योजनेअंतर्गत मासिक पेन्शन मिळते. दरम्यान, तुमच्या पगारावरून दरमहा किती पेन्शन मिळेल ते समजून घ्या.

EPFO Pension: तुम्ही 10 वर्षे नोकरी केली तर किती पेन्शन मिळणार? वाचा A टू Z माहिती
| Updated on: Jan 13, 2025 | 4:59 PM
Share

अनेक खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे वयाच्या 58 किंवा 60 व्या वर्षी निवृत्त होतात. या कर्मचाऱ्यांना ईपीएफचे पैसे देखील मिळतात. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या माध्यमातून ईपीएफचे पैसे मिळतात. अनेक जण आपल्या आयुष्यात फार कमी वर्षे नोकरी करतात आणि नंतर व्यवसायात किंवा इतर कामात गुंततात. अशा कर्मचाऱ्यांना नंतर 60 वर्षे वय झाल्यावर आपल्याला पीएफमधील पैशांमधून पेन्शन मिळणार का? असा प्रश्न पडू शकतो. तर अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत 10 वर्षे जरी काम केलं असेल तर तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल. ईपीएफकडून ईपीएस पेन्शन स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला फिक्स पेन्शन मिळेल. या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शन केव्हापासून, किती मिळणार आणि त्यासाठी पात्रता काय असणार? ते जाणून घेऊया.

ईपीएफओने 16 नोव्हेंबर 1995 ला कर्मचारी पेन्शन योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून ऑर्गनाइस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शन देण्याची योजना बनवण्यात आली आहे. या योजनेतून कर्मचारी जितके दिवस काम करतो त्या हिशोबाने पेन्शन ठरवली जाते. तुम्ही जर 10 वर्षे जरी एखाद्या कंपनीत काम केलं आणि तुमचा पीएफ जमा झाला असेल तर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन किती मिळेल ते जाणून घेऊयात.

ईपीएससाठी पात्रता काय?

ईपीएस म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम केलं असेल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला कमीत कमी 1000 रुपयांची पेन्शन मिळेल. दरम्यान, मिनिमम पेन्शनची रक्कम आता 7500 रुपये प्रती महिना देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या स्कीमचा फायदा 58 वर्षाच्या नंतरच मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचारीचं पीएफ अकाउंट असायला हवं आणि नोकरी करताना त्या पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला हवेत.

ईपीएफ सदस्य आपल्या मूळ वेतनातील 12 टक्के ईपीएफओद्वारे पीएफमध्ये जमा करतात आणि तेवढीच रक्कम कंपनीदेखील जमा करते. तसेच कंपनीकडून देण्यात येणाऱ्या रकमेला दोन भागात विभागलं जातं, यामध्ये 8.33 टक्के ईपीएसला जातात तर 3.67 रुपये रक्कम पीएफमध्ये जाते.

किती मिळणार पेन्शन?

ईपीएसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिली जाणारी पेन्शन ही त्यांनी किती दिवस काम केलं आणि त्यांना देण्यात आलेला पगार या हिशोबाने निश्चित केली जाते. आम्ही इथे तुम्हाला 10 वर्षांपर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचं कॅलक्युलेशन सांगणार आहोत, ज्यांचा महिन्याचा पगार हा 15 हजार रुपये राहिला आहे.

मंथली पेन्शन= ( पेन्शनेबल सॅलरी X पेन्शनेबल सर्विस)/ 70

पेन्शनेबल सॅलरी= तुमच्या शेवटच्या 60 महिन्यांच्या पगाराची सरासरी

या फॉर्म्युल्याद्वारे कर्मचाऱ्यांचं पेन्शन ठरवलं जातं. आता आपण उदाहरणासह समजून घेऊयात.

तुम्ही जर 10 वर्षांपर्यंत एखाद्या कंपनीत काम केलं आहे आणि तुमची पेन्शनेबल सॅलरी ही 15,000 रुपये आहे, तर तुम्हाला दर महिन्याला 2143 रुपये पेन्शन मिळेल. त्याची सुरुवात वयाच्या 58 वर्षापासून होईल.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.