AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Alert:… तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार… ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा

EPFO Alert Profile Photo: ईपीएफओने एक मोठी अपडेट दिली आहे. त्यानुसार, ई-नॉमिनेशन आणि ऑनलाईन क्लेम प्रक्रिया सोपी होण्यासाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार आहे. नाहीतर पीएफ काढताना अडचण येऊ शकते.

EPFO Alert:... तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार... ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा
युनिफाईड मेंबर पोर्टलवर(UAN)
| Updated on: Jul 16, 2026 | 11:25 AM
Share

EPFO Alert Profile Photo: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांसाठी प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला आहे. e-नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि ऑनलाईन क्लेम सेटलमेंट सुटसुटीत करण्यासाठी युनिफाईड मेंबर पोर्टलवर(UAN) सदस्यांना प्रोफाईल फोटो अपलोड करावा लागणार आहे. प्रोफाईल फोटो हा सदस्याचा डिजिटल रेकॉर्डचा भाग आहे. ऑनलाईन व्हेरिफिकेशन प्रक्रियेदरम्यान त्याचा वापर करण्यात येणार आहे.

काय आहे अपडेट?

सध्या सर्व EPFO ​​व्यवहारांसाठी प्रोफाईल फोटो अपलोड करण्याची गरज नाही. पण ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा फोटो अपलोड केलेला नाही. त्यांना e-नॉमिनेशन पूर्ण करण्यापासून ते ईपीएफओच्या इतर सेवांचा फायदा घेण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यासाठी ईपीएफओने एक अलर्ट दिला आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर पीएफ काढताना अडचण येणार नसल्याचे समोर आले आहे.

प्रोफाईल फोटो अपलोड का करावा?

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, EPFO ​​ने कर्मचाऱ्यांना याविषयीची सल्ला दिला आहे. ई-नॉमिनेशनसह इतर प्रक्रियेसाठी सदस्याचा फोटो एक डिजिटल पुरावा ग्राह्य मानला जाणार आहे. त्याआधारे पीएफ खात्यातील शिल्लक, एम्प्लॉईज पेन्शन स्कीम, एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स(EDLI) चे फायदे मिळतील. लाभार्थ्यांना रक्कम सहज हस्तांतरण करता येईल.

जर कर्मचाऱ्याने ईपीएफओ खात्यात त्याचा वारस नेमला नसेल आणि प्रोफाईल फोटोही नसेल तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना दाव्याची रक्कम मिळण्यास उशीर होऊ शकतो. त्यासाठी त्यांना पुरावे आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. ही प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने दाव्याची रक्कम मिळण्यास उशीर होऊ शकतो. पण प्रोफाईल अपडेट असेल तर कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ आणि पीएफ रक्कम काढून घेण्यासाठी कोणताही अडचण येणार नाही.

प्रोफाईलचा फोटो कसा अपडेट करणार?

ईपीएफओच्या युनिफाईड मेंबर पोर्टला भेट द्या. तिथे तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा अपलोड करा.

डॅशबोर्डवर गेल्यावर प्रोफाईल अथवा व्ह्यू हा पर्याय निवडा

आता प्रोफाईल फोटो अपलोड वा अपडेट करण्याचा पर्याय दिसेल. तो निवडा.

या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा. त्यानंतर सेव्ह बटण दाबा

Follow Us
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा