आनंदवार्ता; चेहरा दाखवा नि पीएफची सुविधा मिळवा! EPFO चे कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट, काय आहे अपडेट
EPFO Face Authentication : देशभरातील पीएफ खातेदारांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. आता त्यांना चेहरा दाखवून पीएफ काढता येणार आहे. काय आहे हे नवीन तंत्रज्ञान? काय होणार आहे बदल, जाणून घ्या एका क्लिकवर...

केंद्र सरकारने पीएफ खातेदारांसाठी एकामागून एक आनंदवार्तांचा धडाका लावला आहे. पीएफ एटीएम कार्डनंतर आता तोंड दाखवा आणि पीएफ काढा असे एक नवीन फीचर लवकरच समोर येत आहे. 1 ऑगस्टपासून प्रोव्हिडंट फंडसाठी युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांकाचे (UAN) अलॉटमेंट आणि ॲक्टिवेशन UMANG ॲपच्यामाध्यमातून करण्यात येईल फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीचा (FAT) त्यासाठी वापर करण्यात येईल. केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (EPFO) 1 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यात UAN हे तक्रार, चूक मुक्त करण्याचा पहिला प्रयत्न आहे.
हे तंत्रज्ञान का गरजेचे?
ET च्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांचा युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक (UAN) ॲक्टिव्ह करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर त्यांना EPFO च्या ऑनलाईन सेवेचा वापर करू शकतील. त्यामध्ये EPF चे फायदे मिळवणे आणि एंप्लॉयमेंट लिंक्ड इन्सेटिव्हचा (ELI) लाभ मिळण्याचा समावेश आहे. खास करून कर्मचाऱ्यांना EPF मधून पैसे काढणे, बॅलेन्स तपासणे आणि माहिती अद्ययावत करण्यासारख्या सेवांची गरज आहे.
काय आहे नवीन सुविधा?
UMANG ॲपमध्ये EPF कर्मचाऱ्यांसाठी 3 नवीन सेवा आणि सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. या सुविधा कर्मचाऱ्यांना FAT च्या वापराआधारे देण्यात येतील. थेट UAN अलॉटमेंट आणि ॲक्टिवेशन त्यांना करावे लागेल. त्यामाध्यमातून या ॲपवर त्यांना लॉगिन करण्यासाठी चेहरा दाखवावा लागेल.
UAN साठी का आवश्यकता?
या सेवेचा लाभ घेण्यासाठी केवळ Aadhaar Face RD आणि UMANG ॲप प्लेस्टोरमधून डाऊनलोड करता येईल. सदस्य हे त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून EPFO वा कंपनीची मदत न घेता या सेवेचा लाभ घेऊ शकतील. कंपनीच्या EPFO ऑनबोर्डिंगसाठी e-UAN कार्डला PDF फॉर्मेटमध्ये मिळवू शकतील.
या स्टेप्स करा फॉलो
ज्या कर्मचारी, सदस्यांकडे UAN नाही. त्यांना या पद्धतीने या सेवेचा वापर करता येईल.
स्टेप 1 : UMANG ॲपवर UAN Allotment and Activation वर जा
स्टेप 2 : आधार क्रमांक, मोबाईल, आधार व्हेरिफिकेशनवर टीक करा.
स्टेप 3 : Send OTP वर टॅप करा. आधारवरील OTP व्हेरिफेकशन करा.
स्टेप 4 : Aadhaar Face RD ॲप इन्स्टॉल करा.
स्टेप 5 : UAN नसेल तर फेस ऑथेंटिकेशनसह पुढे जा. Face Authentication वर टॅप करा. चेहरा स्कॅन होईल.
स्टेप 6 : एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की UAN जनरेट होईल आणि SMS सह तुमच्या मोबाईलवर पाठवेल. पुढील वेळी तो उपयोगी ठरेल.
