EPFO | निवडणुकीपूर्वी व्याज दरवाढीची खेळी! मग 1 लाखांवर तुमचा किती होणार फायदा? जाणून घ्या फॉर्म्युला

EPFO | सरकारने सलग दुसऱ्या वर्षी ईपीएफच्या व्याज दरात वाढ केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 0.05 टक्के वाढ केली. आता आर्थिक वर्ष 2023-24 साठी 0.10 टक्के वाढ केली. व्याजातील दरवाढीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात व्याजाची किती रक्कम जमा होणार माहिती आहे का?

EPFO | निवडणुकीपूर्वी व्याज दरवाढीची खेळी! मग 1 लाखांवर तुमचा किती होणार फायदा? जाणून घ्या फॉर्म्युला
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 9:20 AM

नवी दिल्ली | 11 February 2024 : केंद्रातील भाजप सरकारने लोकसभेची तयारी सुरु केलेली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजात दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. केंद्र सरकारने सलग दुसऱ्या वर्षात ईपीएफवरील व्याजदरात वाढ केली आहे. तर काँग्रेसनंतर निच्चांकी व्याज दराचा विक्रम मोदी सरकारच्याच नावे आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 0.05 टक्के वाढ केली. आता आर्थिक वर्ष 2023-24 साठी 0.10 टक्के वाढ केली. म्हणजे गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारने ईपीएफच्या व्याज दरात 0.15 टक्क्यांची वाढकेली. एकूण व्याज दर आता 8.25 टक्के आहे. गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी व्याजदर आहे.

कसा कपात होतो ईपीएफ?

ईपीएफओ कायद्यानुसार, कर्मचाऱ्याचा मुळ पगार आणि महागाईच्या 12 टक्के रक्कम प्रोव्हिडंट फंडमध्ये जमा करण्यात येते. तर कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात 12 टक्के निधी जमा करते. पण यामधील 3.67 टक्के वाटा ईपीएफमध्ये जमा होतो. तर 8.33 टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधी योजनेत जमा होते. सध्याच्या व्याज दरा आधारे त्यावर ठराविक कालावधीनंतर रक्कम जमा होते.

हे सुद्धा वाचा

खात्यात किती जमा होणार व्याजाची रक्कम?

ईपीएफओची संस्था CBT ने ईपीएफ व्याजदरात 8.25 टक्के वाढीचा निर्णय घेतला. पूर्वी हा व्याज दर 8.10 टक्के होता. आता या निर्णयाचा कसा फायदा होईल ते समजून घेऊयात. समजा, तुमच्या पीएफ खात्यात एकूण 1 लाख रुपयांची रक्कम जमा आहे. तर गेल्या आर्थिक वर्षातील व्याजदर 8.15 टक्क्यांच्या हिशोबाने 8,150 रुपये बँक खात्यात जमा होतील. आता व्याजदरात वाढ झाली आहे. व्याजदरात वाढ होऊन ते 8.25 टक्क्यांवर पोहचले आहे. जर एखाद्या बँक खातेदाराच्या खात्यात 1 लाख रुपये असतील तर आता त्याला 8250 रुपये व्याज मिळेल. म्हणजे ईपीएफ खातेदाराला आता 100 रुपयांचा फायदा होईल.

या तीन पद्धतीने तपासा बॅलन्स

अनेक सदस्यांना पासबुकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे. किती रक्कम काढता येते. खात्यासंबंधीची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते. त्यांना या तीन पद्धतीने खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती घेता येईल.

उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स

  • स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा. येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.

मिस्ड कॉलद्वारे PF मधील शिल्लक जाणून घ्या

  • तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

एसएमएसद्वारे जाणून घ्या रक्कम

  • पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.