AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: महत्त्वाची बातमी! पीएफ खातेधारकांनो हे 4 पर्याय फोनमध्ये सेव्ह करा, बरेच फायदे मिळणार

मीडिया रिपोर्टनुसार, या महिन्याच्या अखेरीस पगारदारांच्या खात्यावर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित केले जाणार आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 8.5 टक्के व्याज मिळेल.

EPFO: महत्त्वाची बातमी! पीएफ खातेधारकांनो हे 4 पर्याय फोनमध्ये सेव्ह करा, बरेच फायदे मिळणार
Employees’ Provident Fund (EPF)
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Aug 14, 2021 | 10:21 AM
Share

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच पीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या महिन्याच्या अखेरीस पगारदारांच्या खात्यावर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित केले जाणार आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 8.5 टक्के व्याज मिळेल. तुम्ही या 4 मार्गांनी घरी बसून तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्स तपासू शकता, आम्ही तुम्हाला सांगू कसे ते सांगणार आहोत.

1. अशा प्रकारे SMS द्वारे बॅलन्स तपासा

जर तुमचे UAN EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या ताज्या योगदानाची आणि PF शिल्लक माहिती एका मेसेजद्वारे मिळवू शकता, यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. जर तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे. हा एसएमएस यूएएनच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून पाठवावा.

2. मिस्ड कॉलद्वारे शिल्लक तपासा

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 ला मिस्ड कॉल द्या. यानंतर तुम्हाला EPFO ​​कडून एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या PF खात्याचा तपशील मिळेल. यासाठी बँक खाते, पॅन आणि आधार यूएएनशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

3. EPFO ​​द्वारे कसे तपासाल?

>> यासाठी तुम्हाला EPFO ​​कडे जावे लागेल. >> येथे कर्मचारी केंद्रित सेवांवर क्लिक करा. >> आता पासबुकवर क्लिक करा. >> पासबुक पाहण्यासाठी तुम्हाला UAN सह लॉगिन करावे लागेल.

4. उमंग अॅप द्वारे कसे तपासाल?

>> तुमचे उमंग अॅप (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. >> तुम्हाला दुसऱ्या पेजवर कर्मचारी-केंद्रित सेवांवर क्लिक करावे लागेल. >> येथे पहा पासबुकवर क्लिक करा. >> तुमचा यूएएन क्रमांक आणि पासवर्ड (ओटीपी) क्रमांक टाका. >> तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. >> यानंतर तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स तपासू शकता.

संबंधित बातम्या

बँकेचा अलर्ट! तुमच्या खात्यातून 12 रुपये कापले? तर जाणून घ्या असं का घडलं?

7th Pay Commission News: : कर्मचाऱ्यांनंतर आता बँकर्ससाठी खुशखबरी, महागाई भत्त्यात ऑगस्टपासून 2.1 टक्के वाढ

EPFO: Important News! PF account holders save these 4 options in the phone, you will get many benefits

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली