EPFO पोर्टलवरुन जुन्या खात्यातून नव्या खात्यात PF ऑनलाईन ट्रान्सफर कसा करायचा? वाचा सोप्या टिप्स

जुन्या खात्यातून तुमच्या नवीन खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाइन प्रकिया माहिती असणं आवश्यक आहे. दोन्ही खात्यावरील रक्कम एकत्रित केल्यानं खातेदारांना जादा व्याज मिळतं.

EPFO पोर्टलवरुन जुन्या खात्यातून नव्या खात्यात PF ऑनलाईन ट्रान्सफर कसा करायचा? वाचा सोप्या टिप्स
पीएफ
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 1:14 PM

नवी दिल्ली : तुम्ही ईपीएफओचे सदस्य असाल आणि तुम्हाला भविष्य निर्वाह निधीची रक्कम (PF) जर तुमच्या नव्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) मध्ये पीएफ हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देत आहे. अनेकदा कर्मचारी विविध कारणांमुळं कंपनी बदलतात. नव्या कंपनीत रुजू झाल्यानंनतर त्याचं ईपीएफओच्या यूएएन क्रमांकावर नवं खात काढलं जातं. अशावेळी जुन्या खात्यातून तुमच्या नवीन खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाइन प्रकिया माहिती असणं आवश्यक आहे. दोन्ही खात्यावरील रक्कम एकत्रित केल्यानं खातेदारांना जादा व्याज मिळतं.

पीएफच्या जुन्या खात्यातून नव्या खात्यात पैसे कसे पाठवणार

स्टेप1: सगळ्यात आधी EPFO ला यूनिफाईड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा. इथे यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.

स्टेप 2: लॉगइन केल्यानंतर Online Services वर जा आणि Member-One EPF Account Transfer Request ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 3: यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फोर्मेशन आणि पीएफ अकाऊंट वेरिफाय करावं लागेल.

स्टेप 4: यानंतर Get Details ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 5: आता तुमच्याकडे ऑनलाईन क्लेम फॉर्मची पुष्टी करण्यासाठी मागील नियोक्ता आणि वर्तमान नियोक्ता यांच्या दरम्यान निवड करण्याचा पर्याय असेल. तुम्ही अधिकृत सिग्नेटरी होल्डिंग डीएससीच्या उपलब्धतेवर आधारित हे निवडले आहे. दोन मालकांपैकी कोणतेही निवडा आणि सभासद आयडी किंवा यूएएन द्या.

स्टेप 6: यानंतर सगळ्यात शेवटी Get OTP ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. नंतर ओटीपी सबमिट करा.

स्टेप7 : ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रोसेस रिक्वेस्टसाठी जाईल.

स्टेप 8: ही प्रक्रिया पुढच्या तीन दिवसांत पूर्ण होईल. सगळ्यात आधी कंपनी ती हस्तांतरित करेल. तर ईपीएफओचे फील्ड अधिकारी याची पडताळणी करतील.

ऑफलाईन ट्रान्सफर कसं करायचं?

ओटीपी टाकल्यानंतर आपल्या कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रक्रियेसाठी विनंती केली जाईल. प्रथम कंपनी पैसे हस्तांतरित करेल आणि त्यानंतर ईपीएफओचा फील्ड अधिकारी याची पडताळणी करेल. हस्तांतरण विनंती पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण ट्रॅक क्लेम स्थितीवर आपली स्थिती तपासू शकता. ऑफलाईन हस्तांतरणासाठी आपल्याला फॉर्म 13 भरावा लागेल आणि आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला द्यावा लागेल.

आधार लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली

सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 30 जूनवरून 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. आता ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. कलम 139AA नुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयकर विवरणपत्रात आधार क्रमांक देणे आणि पॅन वाटपासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. पीएफ खातेधारकांना त्यांचा आधार त्यांच्या यूएएनशी जोडला असेल तरच ते पूर्णपणे लाभ घेऊ शकतील. ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कर्मचाऱ्यांचे किंवा नियोक्त्याचे योगदान पीएफ खात्यात जमा केले जाऊ शकत नाही.

इतर बातम्या:

EPFO : नोकरी सोडल्यानंतर PF अकाऊंटवर किती मिळतं व्याज? वाचा सविस्तर

EPFO : महिलांना ईपीएफओ देते खास सुविधात, मिळतात मोठे फायदे

EPFO pf account how to transfer old account money to new pf account using UAN number know all process

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.